‘एसटी’ महामंडळाच्या तिजोरीतून दिवाकर रावते यांचे ‘परिवहन’
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षाला राज्य सरकारच्या निर्णयानुसार फक्त एक वाहन वापरण्याची परवानगी असताना परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते हे महामंडळाची चार ते पाच वाहने ‘उपयोगात’ आणत असल्याचे उघडकीस आले आहे. रावते यांच्या दिमतीस असलेल्या चालकांचा जादा वेळचा भत्ता (ओव्हरटाईम) आणि डिझेलचा खर्च एस.टी.च्या तिजोरीतून केला जात आहे. रावते यांच्यासाठी महामंडळाची ही ‘कार-सेवा’ गेले किमान वर्षभर सुरू असून फक्त डीझेलमुळे महामंडळाच्या लाखो रुपयांचा चुराडा झाला असल्याचे समजते.
त्यांच्या ताफ्यातली एक गाडी (क्र: १४०७) दादरला मंत्र्यांच्या चिरंजिवांच्या सेवेत असते असे सांगितले जात आहे. या गाडीवर महामंडळाच्या सेवेतील व्ही. व्ही. राणे (बिल्ला क्रमांक: २५८८०) हे चालक आहेत. महामंडळाच्या जून-जुलच्या नोंदीनुसार रावते यांच्या वाहनांवर एकाच दिवशी चार ते पाच वाहन-चालक कार्यरत होते. व्ही. एच. गीते हे चालक (बिल्ला क्र: १५८५१) रावते यांच्या खास मर्जीतले असल्याचे महामंडळात बोलले जाते. कामगार कायद्यानुसार गीते यांनी अनेक महिन्यांपासून एकही दिवस रजा घेतली नाही. त्यांना ताशी दोनशे रुपये जादा भत्ता मिळतो. गीते यांच्या विरुद्ध अपघाताचे गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटते. हा सर्व प्रकार गाडय़ांचे व्यवस्थापन करणारे एसटीचे वाहतूक अधिकारी वसंत चव्हाण यांच्या सहकार्याने होत असल्याचा आरोप एसटीमधील काही कर्मचाऱ्यांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर केला.
बंधन तोडण्याची भरारी
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षांना फक्त एकच वाहन वापरण्याची परवानगी असल्याचा शासन निर्णय २ फेब्रुवारी, २०१६ रोजी काढण्यात आला. (शासन निर्णय क्रमांक: एसटीसी-०७१५/प्र.क्र.४४५/परि-१). परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे महामंडळाच्या अध्यक्षपदाचीही सूत्रे असल्यामुळे हा निर्णय त्यांच्यावर बंधनकारक आहे. परंतु रावते हे बिनदिक्कतपणे महामंडळाची चार ते पाच वाहने स्वत:च्या नावावर वापरत आहेत. टाटा इंडिगो कंपनीच्या या सर्व वातानुकूलित गाडय़ा अद्ययावत सजावट केलेल्या आहेत.
महामंडळाच्या लॉग बुकनुसार
- महामंडळाच्या वाहनांचे क्रमांक: एमएच एझेड ५३२१, एमएच ०६ व्ही ८४४४, १४०७, ३५५३. या गाडय़ा परिवहन मंत्र्यांसाठी धावत होत्या.
- जी.डी. खरावे (बिल्ला क्रमांक: ३५७२१), पी.एन. कबाडे (३५२८२), व्ही.व्ही. राणे (२५८८०), बी. एच. गीते (१५८५१) हे वाहन चालक मंत्र्यांच्या सेवेत असल्याची नोंद एस.टी. महामंडळाच्या जून-जुलच्या लॉग बुकमध्ये आहे.
‘हे तर नियमानुसारच!’- रावते
‘या गाडय़ा मी कार्यालयीन कामासाठीच वापरतो. मंत्री म्हणून मी माझी स्वतचीच गाडी वापरतो. कार्यालयीन कामकाजासाठी महामंडळाच्या गाडय़ा वापरण्याचे अधिकार अध्यक्षाला असतात, त्यामुळे हे नियमानुसारच आहे.’ – दिवाकर रावते, परिवहन मंत्री