लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीतील १६८ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीशी संबंधित प्रकरणात सुरेश कुटे व इतरांविरोधात सुरू असलेल्या तपासाअंतर्गत सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई येथे विविध ठिकाणी नुकतेच छापे टाकले. या कारवाईत डी-मॅट खाते, बँक खाते यांच्यासह संशयित कागदपत्रे, डिजिटल उपकरणे असे एकूण एक कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली.

Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
Extravagance of one lakh crores by rulers party in state Priyanka Chaturvedis allegation
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एक लाख कोटीची उधळपट्टी, ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले

यातील आरोपी सुरेश कुटे आणि संबंधितांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या (डीएमसीएसएल) माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूक योजना राबविल्या. त्यानंतर, कुटे यांच्या विरोधात फसवणुकीचे नऊ गुन्हे दाखल झाले. सहकारी संस्थेच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या स्वरूपात १६८ कोटी रुपयांच्या करण्यात आलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीने याप्रकरणात ९ ऑगस्ट रोजी बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नवी मुंबई येथील विविध ठिकाणी छापे टाकले. ईडीने या कारवाईत जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याचे ईडीकडून सोमवारी सांगण्यात आले.

आणखी वाचा-म्हाडाचा अजब कारभार! घराचा ताबा २०२३ मध्ये, पण देखभाल शुल्क २०१४ पासूनचे

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानराधा मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ५२ पेक्षा जास्त शाखा आहेत. याचे व्यवस्थापन आणि नियंत्रण सुरेश ज्ञानोबाराव कुटे, यशवंत व्ही. कुलकर्णी आणि अन्य संबंधित करत होते. विविध ठेव योजना आणत त्यांनी १२ ते १४ टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचा दावा केला. वैयक्तिक कर्ज, साधे कर्ज, पगार कर्ज, मुदत कर्ज, सुवर्ण कर्ज आणि एफडीआर कर्ज अशा विविध योजना सुरू केल्या. यात आतापर्यंत नोंदवलेल्या गुन्ह्यांनुसार, गुंतवणूकदारांसह झालेल्या फसवणुकीची अंदाजित रक्कम १६८ कोटी रुपये आहे.

सुरेश कुटे आणि इतरांनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांना डीएमसीएसएलकडे पैसे जमा करण्याचे आमिष दाखविल्याचे ईडीच्या तपासातून उघड झाले आहे.