नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याने त्यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई करून त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली आहे.
विवाहाचा खर्च कंत्राटदाराने केला आहे, अशी माहिती जाधव यांनी प्राप्तिकर विभागाला दिली आहे. तो सरकारी कंत्राटदार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. जाधव यांनी गेल्या दोन वर्षांत प्राप्तिकर विवरणपत्रेही दाखल केलेली नाहीत. त्यांनी २००९ मध्ये निवडणुकीच्या वेळी दिलेल्या संपत्तीच्या विवरणानुसार विवाहात केलेला खर्च अफाट असून हा मंत्रिपदाचा गैरवापर आहे. त्यामुळे फौजदारी दंडसंहिता आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार जाधव यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.
प्राप्तिकर विभागाने चौकशी सुरू केल्याने जाधव यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा