मुंबईतील फेरीवाल्यांकडून पोलीस व पालिका अधिकाऱ्यांनी ‘हप्ता’ म्हणून उकळलेली रक्कम अधिकृत कर समजून वसूल करावी व फेरीवाल्यांना अधिकृत करावे, अशी मागणी गुरुवारी आझाद मैदानावर काढण्यात आलेल्या मोर्चात करण्यात आली. मुंबईतील फेरीवाल्यांकडून १० वर्षांपूर्वी पैसे घेऊन त्यांना पालिकेकडून पावत्या देण्यात येत होत्या. या फेरीवाल्यांना अधिकृत करावे, फेरीवाल्यांकडून पालिका अधिकारी आणि पोलिसांनी उकळलेली हप्त्याची रक्कम अधिकृत कर समजून वसूल करावी, अशा मागण्या आझाद हॉकर्स युनियनचे अध्यक्ष दयाशंकर सिंग यांनी या वेळी केल्या. मदन जैस्वाल यांच्या मृत्युस कारणीभूत असलेले वसंत ढोबळे यांच्याविरुद्ध कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होईपर्यंत महापालिकेने फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करू नये, पदपथांच्या सौंदर्यीकरणाचे परिपत्रक रद्द करावे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा