पोलीस दलात दिसणारी गुन्हेगारी प्रवृत्ती ही चिंतेची बाब आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा प्रवृत्ती सुधारण्यासाठी वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. पोलीस ठाण्यात येण्यासाठी लोकांना मध्यस्थांची गरज भासते, हे गैर असून ही पद्धत बंद करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सह्य़ाद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. त्या वेळी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, प्रा. राम िशदे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी, प्रधान सचिव डॉ. विजय सतबीर सिंह, पोलीस महासंचालक संजीव दयाळ उपस्थित होते.
पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. कुठल्याही प्रकारची दुय्यम वागणूक मिळता कामा नये, या बाबींची दक्षता घेऊन पोलीस दलाने आपल्या कामात पारदर्शकता आणि कार्यकुशलता आणून सर्वसामान्यांना न्याय द्यावा.
दहशतवाद, नक्षलवाद, आíथक गुन्हे, सायबर गुन्हे, अपराध सिद्ध करण्याचे प्रमाण वाढविणे यांसारख्या आव्हानांबरोबरच जनतेच्या मनात विश्वासार्हता निर्माण करणे हेसुद्धा आव्हान आहे. त्यामुळे लोकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांच्या मनात आधी विश्वासार्हता निर्माण करा, असे खडे बोलही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सुनावले.

Story img Loader