मुंबई : बोगस पदवी प्रमाणपत्राआधारे शहरातील नामांकित रुग्णालयात गेल्या काही वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या स्वप्ना पाटकर यांना वांद्रे पोलिसांनी मंगळवारी अटक के ली. त्यांच्याविरोधात प्राप्त तक्रोरीतील आरोप दावे पडताळल्यावरच ही कारवाई केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यावसायिक गुरदिप कौर हरिंदर सिंग यांनी पाटकर यांच्याविरोधात तक्रोर के ली होती. सिंग यांनी तक्रोरीत के लेल्या दाव्यानुसार त्यांच्या घरी निनावी लिलाफा आला. त्यात पाटकर यांनी कानपूरच्या छत्रपती शाहू महाराज विश्व विद्यालयातून क्लिनीकल सायकोलॉजी विषयात घेतलेली पदवी, इन्फ्लुअन्स ऑफ इमोशन्स ऑन ह्य़ुमन माईंड : अ स्टडी बीयाँड प्रोब्लेम सॉल्व्हिंग अ‍ॅण्ड डिसिजन मेकिंग’ या विषयावर सादर के लेला प्रबंध, शहरातील नामांकित रुग्णालयात त्यांच्या नावापुढे त्यांनी विविध विषयात के लेल्या अभ्यासाची माहिती, मुंबईतील इंदिरा गांधी राष्टीय मुक्त विद्यापीठातील शिक्षण, त्यांच्या ट्विटर खात्यांवरील चाहत्यांची संख्या आदी तपशील या पत्रात होते. तसेच पाटकर यांनी रुग्ण, रुग्णालयासह समाजमाध्यमांवर जाहीर के लेली माहिती खोटी असल्याचाही दावा या पत्रात करण्यात आला होता.

सिंग यांनी स्वत: खातरजमा के ली तेव्हा पाटकर यांच्याकडील पदवी बोगस असल्याचे आढळले, असा दावा तक्रारीत केला. त्या वांद्रे परिसरातील रुग्णालयात पाच वर्षे याच पदवी आधारे रुग्णांवर उपचार करत होत्या. त्यामुळे त्यांच्याविरोधातील तक्रार वांद्रे पोलीस ठाण्यात के ल्याचे सिंग यांनी जबाबात सांगितले. ही तक्रोर प्राप्त होताच वांद्रे पोलिसांनी चौकशी सुरू के ली. पोलिसांनी शाहू विश्व विद्यापिठासह अन्य शैक्षणिक संस्थांना पत्र पाठवून पाटकर यांच्याबाबत विचारणा के ली. यापैकी विश्व विद्यापिठातून ही पदवी, पीएचडी प्रमाणपत्र बनावट असल्याचे प्रत्युत्तर पोलिसांना मिळाले. त्याआधारे पाटकर यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.

पाटकर यांनी एका मराठी दैनिकात स्तंभलेखन के ले होते. तसेच त्यांनी ‘बाळकडू’ या चित्रपटाची निर्मितीही के ली होती. मनोरुग्णांच्या समुपदेशनाशिवाय हॉटेल व्यवसायातही त्यांचा सहभाग आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor arrested for using fake degree to practice at bandra hospital zws