मानखुर्द, गोवंडी परिसरातील अनधिकृत नìसग होमविरुद्ध तक्रार करणाऱ्या एका डॉक्टरला आपल्या कार्यालयात बोलावून त्याच्या संस्थेचे रुग्णालय बंद करण्याची नोटीस देऊन धमकावण्याचा प्रकार पालिका अधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर डॉक्टरनेच आपल्याला मारहाण केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्नही पालिका अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप या डॉक्टरने केला.
एम-पूर्व विभागात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असून त्याविरुद्ध डॉ. अमोल आंबेरकर यांनी ‘एम-पूर्व’ विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ४६ अनधिकृत नìसग होमविरुद्ध पुरावेही त्यांनी सादर केले होते. कारवाई न झाल्यामुळे ते उपोषणास बसले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही.
सोमवारी पालिकेतील डॉ. संदीप गायकवाड यांनी आपल्याला पालिका कार्यालयात बोलावले आणि आपल्या संस्थेचे रुग्णालय तात्काळ बंद करण्याची नोटीस आपल्या हातावर ठेवली. त्यानंतर अनधिकृत नर्सिग होमविरुध्द सुरू असलेली मोहिम बंद करण्याचा सल्ला देत आपल्याला धमकावले. त्यावेळी पालिकेतील शिपाई श्यामराव यादव तेथेच होते. मी कार्यालयातून बाहेर पडण्यासाठी उठलो असता डॉ. गायकवाड आणि यादव यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी आपल्याविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली, असे डॉ. आंबेरकर यांनी स्पष्ट केले. अनधिकृत नर्सिग होमना पाठीशी घालण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी आमचे रुग्णालय बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.