पालिकेच्या नायर रुग्णालयातील तरुण डॉक्टरचा मंगळवारी डेंग्युने मृत्यू झाला. या मृत्युमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्युचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नायर रुग्णालयातील डॉ. सुमेध पझारे यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यू झाला होता. त्यांच्यावर नायर रुग्णालयातच उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी तब्बेत खालावल्यामुळे डॉ.पझारे यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मात्र, मंगळवारी त्यांचे निधन झाले. या दुर्घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टरांच्या वैद्यकीय सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईत मोठय़ा प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागाने सादर केलेल्या डेंग्यूच्या रुग्णांच्या आकडेवारीबाबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. खासगी रुग्णालये व दवाखान्यांमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण येत असताना पालिकेने सादर केलेली आकडेवारी परिस्थितीशी पूर्णपणे विसंगत असल्याचा आरोपही नगरसेवकांकडून करण्यात आला होता. आता रुग्णालयातील डॉक्टरचाच मृत्यू झाल्यामुळे विभागाच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा