रुग्णालय आणि रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर खरे तर पवित्र मानले जातात. पण ताडदेवच्या भाटिया रुग्णालयातील डॉक्टरांच्या वसतिगृहात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या एका घटनने पावित्र्यभंग होऊन चांगलेच नाटय़ रंगले. रुग्णालयाच्या शेजारी डॉक्टरांच्या निवासस्थानात चालणाऱ्या मद्यपार्टीने निर्माण झालेला गोंधळ थेट पोलीस ठाण्यात पोहोचला.
भाटिया रुग्णालयाच्या शेजारी डॉक्टरांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी डॉक्टर नेहमी मद्यपान करीत असतात, असा रहिवाशांचा आरोप आहे. गुरुवारी मध्यरात्री अशीच डॉक्टरांची मद्यपान पार्टी रंगली होती. त्यावेळी मद्याची एक बाटली खाली रहिवाशांच्या चाळीवर पडली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी डॉक्टरांवर दगडफेक  केली. माहिती मिळताच ताडदेव पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.    

Story img Loader