मुंबई : गडचिरोलीच्या नक्षलवादी भागांसह दुर्गम आदिवासी भागात वर्षानुवर्षे कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या आरोग्य विभागातील भरारी पथकाच्या डॉक्टरांना आपण सेवेत कायम करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री म्हणून दिले होते. आता आपण मुख्यमंत्री झाला असून किमान आतातरी आम्हाला आरोग्यसेवेत कायम करा, अशी आठवण करणारे पत्र भरारी पथकातील २८१ डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.

आदिवासी दुर्गम भागात जिथे रस्ते संपतात तेथून पुढे असलेल्या दुर्गम भागात १९९५ पासून आम्ही बीएएमएस (आयुर्वेदिक) डॉक्टर कंत्राटी तत्त्वावर रुग्णसेवा करीत आहोत. आगदी गडचिरोलीत सेवा करतानाही कधी नक्षलवाद्यांची भिती बाळगली नाही. यासह दुर्गम आदिवासी भागात बहुतेक वेळा आम्हा डॉक्टरांना पुरेशा सोयी सुविधा नसतानाही रुग्णसेवेचे व्रत आम्ही सोडले नाही. एमबीबीएस डॉक्टरांनी येथे यावे म्हणून आरोग्य विभागाने आतातपर्यंत शेकडो वेळा जाहिराती काढल्या आहेत. मात्र येथील प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाला दूर सोडून येण्यास कोणीही एमबीबीएस डॉक्टर तयार नसल्यामुळे आरोग्य विभाग आम्हा बीएएमएस डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णसेवा चालवत आहेत. यासाठी आम्हाला विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून साप चावणे, विंचू दंश, किरकोळ आजारांपासून आदिवासी मातांची बाळंतपण आणि लहान मुलांच्या आरोग्यापासून वृद्धांच्या आजारांवर उपचार करण्याचे काम आम्ही गेले काही दशके करत आहोत. अनेकदा या दुर्गम भागात शवविच्छेदनाची जबाबदारीही भरारी पथकाचे डॉक्टरच पार पाडतात, याची आरोग्यमंत्री असताना आपणास पूर्ण कल्पना होती. म्हणूनच दुर्गम आदिवासी भागात आम्ही करत असलेल्या कामाची दखल घेऊन आरोग्यमंत्री असताना आपण आम्हाला आरोग्य सेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले होते, असे भरारी पथकाच्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

commissioner review facilities in girls ashram school
आयुक्तांकडून कन्या आश्रमशाळेतील सुविधांचा आढावा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Kelzar, Leopard died Wardha, Leopard latest news,
वर्धा : प्रजननकाळच बिबट्यांच्या जीवावर उठतोय, जंगल सोडून रस्त्यावर येतात, आणि….
Steering Committee Approves Maharashtra Revised Curriculum with CBSE Influence
लेख : देशांतर्गत वसाहतीकरणाचा ‘आराखडा’!
dr madhukar bachulkar new mahabaleshwar
नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी, डॉ. मधुकर बाचूळकर यांचे टीकास्त्र
objective of implementing the mgnrega
लेख : ‘मनरेगा’च्या मूळ हेतूंकडे दुर्लक्ष नको!
Mukesh Ambani donates ₹5 crore to Badrinath and Kedarnath shrines during visit. Watch
VIDEO: मुकेश अंबानींच्या दानशूरतेची चर्चा! बद्रीनाथ-केदारनाथच्या दर्शनानंतर दिलं ‘इतक्या’ कोटींचं दान
sawantwadi tree cut
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील वृक्षतोड रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’ समिती स्थापन

राज्यातील १६ आदिवासी अतिदुर्गम, नक्षलग्रस्त जिल्ह्यात आम्ही १९९५ पासून अहोरात्र आरोग्यसेवा देत आहोत. करोनाच्या मागील दोन वर्षांत जीवाची तसेच कुटुंबाची पर्वा न करता कुटुंबापासून तीन तीन महिने दूर राहून आरोग्य सेवा दिली. आदिवासी भागात जिथे रस्ता संपतो, अशा ठिकाणी जाऊन नद्या, नाले, पाडे, तांडे वाड्या, जंगली भागात जिथे वाघ- सिंह आदी हिंस्त्र प्राणी आहेत अशा भागात अनेकदा मूलभूत सुविधा नसतानाही आरोग्य सेवेत खंड पडू दिला नाही. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती (मेळघाट, चिखलदरा) नंदुरबार,नाशिक, धुळे पालघर, आशा ठिकाणी महिन्याला ८० ते ९० हजार गरोदर माता, स्तनदा मातांवर उपचार करतो. दररोज आम्ही २८१ डॉक्टर, सरासरी ५० ते १०० रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करतो. याशिवाय अंगणवाडीतील बालकांपासून आश्रमशाळांतील बालकंच्या आरोग्याची तपासणी, कुपोषित बालकांवर प्राथमिक उपचारापासून लसीकरण,पुरुष व स्त्री नसबंदी शस्त्र क्रियेसाठी प्रवृत्त करणे व विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवतो. प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेकदा डॉक्टरांच्या अनुपस्थितीत बाह्य व आंतररुग्ण उपचारांसह वरिष्ठांच्या आदेशानुसार वेळोवेळी सोपविण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडत असतो. यातूनच आज दुर्गम आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी होण्यास मोठी मदत झाल्याचे आरोग्य विभागातील उच्चदस्थही मान्य करतील.

हेही वाचा : VIDEO: आरोग्य विभागावर मंत्र्यांचा वचक नाही का? मेळघाटातील कुपोषण मृत्यूवरील प्रश्नावर मंत्री लोढा म्हणाले…

आजपर्यंत अनेक वेळा आम्हाला सेवेत कायम करण्यासाठी बैठक झाल्या. अनेकदा आदिवासी भागातील आमदारांनी भरारी पथकाच्या डॉक्टरांना सेवेत कायम करण्याच्या प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवला तथापि आम्हाला सेवेत कायम करण्याचा निर्णय आजपर्यत होऊ शकला नाही.आमच्यातील अनेक डॉक्टरांनी वयाची पन्नाशी गाठली आहे. एका अपक्षेने आम्ही आपणास हे पत्र लिहिले आहे. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ ची सुमारे ४०० पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागाने २७ डिसेंबर रोजी काढलेल्या शासन आदेशात गट ‘ब’ वैद्यकीय रिक्त पदांच्या जागी पूर्णवेळ उमेदवार मिळत नाही तोपर्यंत बीएएमएस वैद्यकीय अधिकारी ताप्तुरत्या स्वरुपात भरण्याचे नमूद केले आहे. ही गंभीर बाब असून दोन दशकांहून अधिक काळ अतिदुर्गम आदिवासी भागात काम करणाऱ्या २८१ कंत्राटी डॉक्टरांवर हा अन्याय असल्याचे भरारी पथकाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. गंभीरबाब म्हणजे अनेकदा आम्हाला वेळेवर पगार मिळत नाही. महिनेमहिने पूर्ण पगार मिळत नाही तसेच प्रवासभत्ताही मिळत नाही. विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही भरारी पथकाच्या डॉक्टरांना सेवेत कायम करण्यास हरकत नाही, अशी भूमिका घेतली असून किमान आतातरी आम्हाला सेवेत कायम करात, असे साकडे भरारी पथकाच्या डॉक्टरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या पत्रात घातले आहे.