Dombivli MIDC Blast : जवळपास १५ दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीमधील एका कारखान्यात मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या स्फोटात कारखान्यातील १३ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवली एमआयडीसीतील आणखी एका कारखान्यात स्फोट झाले आहेत. या स्फोटांमुळे कारखान्याला मोठी आग लागली आहे. या आगीचे लोळ पाहून परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे. दोन आठवड्यांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान या कंपनीत आग लागली होती. आता याच अमुदान कंपनीच्या शेजारी असलेल्या इंडो अमाईन्स कंपनीत आग लागली आहे. कारखान्यात स्फोटांची मालिका चालू असून परिसरात घबराट पसरली आहे. या एमआयडीसी परिसरात एक शाळा देखील आहे. आग आणि स्फोटांची मालिका पाहून शाळेने सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवलं आहे.

या कारखान्यात मजूर होते का याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सकाळी कारखान्याच्या आसपास मजूस दिसले होते. त्यामुळे या स्फोटावेळी मजूर कारखान्यात असण्याची शक्यता आहे. धुरामुळे तसेच स्फोट होत असल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ही एक रासायनिक कंपनी आहे. या कंपनी परिसरातील उत्पादन प्रक्रिया बंद करून कामगारांना सुरक्षितेच्या दृष्टीने कंपनी बाहेर काढण्यात आलं आहे. इंडो अमाईन्स कंपनीत जीवितहानी झाली नसल्याचं प्राथमिक वृत्त आहे. वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli midc factory blast fire breaks out makes panic in area asc
First published on: 12-06-2024 at 10:47 IST