दावडी गावी शुक्रवारी झालेल्या भंगार गोदामातील रसायन टँकरच्या स्फोटातील तीन आरोपींना कल्याण सत्र न्यायालयाने बुधवार, ११ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या आरोपींवर मानपाडा पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी दावडीच्या भंगार गोदामात रसायनांचा टँकर गॅस कटरने कापताना स्फोट होऊन त्यात तीन जण जागीच ठार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळपासून या भागातील टँकरचा पुरवठा करणारे व्यावसायिक, मुंबईतील नळबाजार, नागपाडा, अंधेरी, भायखळा, कळंबोली येथील मोठे भंगार विक्रेते व खरेदीदारांचा शोध सुरू केला आहे. सरपंच गायकर यांना अटक झाल्यानंतर या भागातील अनेक जमीन मालकांनी आपल्या जमिनींवर सुरू असलेले रसायन भेसळीचे धंदे, भंगार विक्रेते, भाजीफळ विक्रेते यांना आपल्या मालकीच्या जागा रिकाम्या करण्याच्या सूचना केल्या आहेत. पिसवली, गोळवली, दावडी, सोनारपाडा, मानपाडा ते शिळफाटय़ापर्यंत काही भूमिपुत्रांनी सरकारी जमिनींवर अनधिकृत उद्योग सुरू करण्यास परप्रांतीयांना जागा दिल्या आहेत.
डोंबिवली भंगार स्फोटातील आरोपींना पोलीस कोठडी
दावडी गावी शुक्रवारी झालेल्या भंगार गोदामातील रसायन टँकरच्या स्फोटातील तीन आरोपींना कल्याण सत्र न्यायालयाने बुधवार, ११ डिसेंबपर्यंत
First published on: 08-12-2013 at 03:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli tanker blast case accused sent in police custody