दावडी गावी शुक्रवारी झालेल्या भंगार गोदामातील रसायन टँकरच्या स्फोटातील तीन आरोपींना कल्याण सत्र न्यायालयाने बुधवार, ११ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या आरोपींवर मानपाडा पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी दावडीच्या भंगार गोदामात रसायनांचा टँकर गॅस कटरने कापताना स्फोट होऊन त्यात तीन जण जागीच ठार झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळपासून या भागातील टँकरचा पुरवठा करणारे व्यावसायिक, मुंबईतील नळबाजार, नागपाडा, अंधेरी, भायखळा, कळंबोली येथील मोठे भंगार विक्रेते व खरेदीदारांचा शोध सुरू केला आहे. सरपंच गायकर यांना अटक झाल्यानंतर या भागातील अनेक जमीन मालकांनी आपल्या जमिनींवर सुरू असलेले रसायन भेसळीचे धंदे, भंगार विक्रेते, भाजीफळ विक्रेते यांना आपल्या मालकीच्या जागा रिकाम्या करण्याच्या सूचना केल्या आहेत. पिसवली, गोळवली, दावडी, सोनारपाडा, मानपाडा ते शिळफाटय़ापर्यंत काही भूमिपुत्रांनी सरकारी जमिनींवर अनधिकृत उद्योग सुरू करण्यास परप्रांतीयांना जागा दिल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा