धुळे येथील दोंडाईचा येथे ३३०० मेगावॉट क्षमतेचा वीजप्रकल्प भागीदारीत उभारण्याचा निर्णय बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाला. धुळे येथील दोंडाईचा येथे ३३०० मेगावॉट क्षमतेचा वीजप्रकल्प नियोजित आहे. पण तो ‘महानिर्मिती’ने करायचा की खासगी क्षेत्रामार्फत उभारायचा याबाबत संभ्रम होता. त्यामुळे बराच काळ या प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले होते. या पाश्र्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन धोरण ठरवण्यात आले. दोंडाईचा वीजप्रकल्प अत्याधुनिक सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळासारख्या (एनटीपीसी) देशपातळीवरील नामांकित आणि अनुभवी कंपनीचे सहकार्य घ्यावे. त्यांच्यासह भागीदारीत प्रकल्प करावा. यादृष्टीने ‘एनटीपीसी’सह बोलणी करण्यास सुरुवात करावी, असा निर्णय या बैठकीत झाला. त्यामुळे दोंडाच्या प्रकल्पासमोरील धोरणात्मक पेच सुटला असून आता हा प्रकल्प उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा