मुंबई : राज्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना बाजारभावाच्या दुप्पट मोबदला देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. वीज मनोरा आणि वाहिनी उभारण्यासाठी जमिनीचे अधिग्रहण न करता केवळ त्या जमिनीचा वापर केला जातो. हा मनोरा उभारताना जमिनीच्या आणि पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो. मात्र, यासाठी दिला जाणारा मोबदला कमी असल्याने अनेक शेतकरी आपल्या शेतातून वीज वाहिनी टाकण्यास किंवा मनोरा उभारण्यास विरोध करीत असतात. त्यामुळे पारेषण कंपन्यांचे विविध प्रकल्प रखडले आहेत. त्यामुळे या धोरणात बदल करीत वाढीव मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी नव्या धोरणामुळे मनोरा आणि वाहिनी उभारणी वेगाने होऊन वीज निर्मितीस मदत होईल असा दावा उर्जा विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला.
वीज मनोरे, वाहिन्या उभारण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला
राज्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना बाजारभावाच्या दुप्पट मोबदला देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-10-2022 at 00:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Double payment to farmers for setting up power towers ysh