मुंबई : दुकाने व आस्थापनांवर मराठी भाषेत, देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलक लावण्याच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मराठी पाटी नसलेल्या व्यावसायिकांना आता दुप्पट मालमत्ता कर भरावा लागेल.

मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी आढावा बैठकीनंतर दिले. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेनुसार, दुकाने व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत ठळक अक्षरात लावण्यासाठी दिलेली दोन महिन्यांची मुदत २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर, २८ नोव्हेंबर २०२३ पासून महापालिकेने तपासणी सुरु केली. ३१ मार्चपर्यंत ८७,०४७ पैकी ८४,००७ दुकाने व आस्थापनांनी (९६.५० टक्के) मराठीत नामफलक लावल्याचे आढळून आले आहे. उर्वरित ३,०४० आस्थापनांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

हेही वाचा – पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल

मराठी पाट्यांसंदर्भात न्यायालयात एकूण १,९२८ प्रकरणे दाखल झाली असून १७७ व्यावसासियांना १३ लाख ९४ हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. १,७५१ प्रकरणांची सुनावणी प्रलंबित आहे. महापालिका प्रशासनाकडे सुनावणीसाठी आलेल्या ९१६ पैकी ३४३ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यातून ३१ लाख ८६ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. उर्वरित ५७३ प्रकरणांच्या सुनावणीची प्रशासकीय कार्यवाही सुरु असल्याचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

हेही वाचा – प्रक्षोभक भाषण प्रकरण : नितेश राणे, गीता जैन, टी. राजांविरोधात फौजदारी कारवाई करणार का ? उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना प्रश्न

प्रकाशित फलकांचा परवाना रद्द होणार

मराठीत नामफलक नसेल, तर प्रकाशित फलकासाठी (ग्लो साईन बोर्ड) दिलेला परवानाही तत्काळ रद्द करण्यात येणार आहे. हा परवाना रद्द झाल्यास नव्याने परवाना मिळविणे, फलक तयार करणे यासाठी संबंधित आस्थापनाधारकांना २५ हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत भुर्दंड सहन करावा लागू शकतो.