मोटार गाडय़ांना असणाऱ्या विशेष क्रमांकांसाठी आकारण्यात येणारे दर दुप्पट करण्यात आले आहेत. महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
दुचाकी असो वा चारचाकी वाहन! या वाहनांना विशिष्ट क्रमांक घेण्याची हौस अनेकांना असते आणि त्यासाठी जादा रक्कम देण्याची तयारी त्यांची असते. परिवहन विभागाला असे क्रमांक घेणाऱ्यांकडून मिळणारा महसूल वर्षांला सहा कोटी रुपये इतका आहे. मार्च २०१२ मध्ये परिवहन विभागाने राज्य शासनाला विशिष्ट क्रमांकांसाठी आकारण्यात येणारे दर वाढविण्याची परवानगी एका प्रस्तावाद्वारे मागितली होती. राज्य शासनाने या प्रस्तावाला अलिकडेच मान्यता दिली असून आता हे दर दुप्पट होणार आहेत. एक क्रमांक या विशेष क्रमांकाला मात्र जास्त रक्कम आकारण्यात येणार आहे. सध्या या क्रमांकाला एक लाख रुपये आकारण्यात येतात. १ जानेवारीपासून त्याचा दर चार लाख रुपये इतका होणार आहे. अन्य दर मात्र सध्यापेक्षा दुप्पट होणार आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा