मुंबई : दारूमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी दारूबंदी नव्हे, तर दारू नितीची गरज आहे. दारूबंदीमुळे मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल, पण ते शून्य होणार नाही. त्यासाठी दारू नीतीची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले. यशवंतराव चव्हाण केंद्र, प्रथम आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईतर्फे माजी सनदी अधिकारी व यशवंतराव चव्हाण केंद्राचे सरचिटणीस शरद काळे यांच्या प्रथम स्मृतीप्रितर्थ्य मंगळवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दारू नीतीची अंमलबजावणी करून मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण गडचिरोलीत ६८ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे गडचिरोलीत राबवण्यात येत असलेला ‘मुक्तिपथ’ हा महाराष्ट्रासाठी पथदर्शी प्रकल्प ठरू शकतो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा…वहिनीचा जीव घेणाऱ्या दिराला जन्मठेप, बुलढाणा न्यायालयाचा निकाल; न्यायाधीशांनी केली होती…

यावेळी यशवंतराव चव्हाण केंद्राचे सरचिटणीस हेमंत टकले, ‘प्रथम’च्या संचालिका फरीदा लांबे, शरद काळे यांच्या पत्नी सुनीती काळे, त्यांच्या कन्या डॉ. सुचित्रा काळे-दळवी, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्ष प्रा. विस्पी बालापोरिया, यशवंतराव चव्हाण केंद्राचे विश्वस्त अजित निंबाळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr abhay bang express their thoughts on alcohol ban in a lecture talk in memory of late sharad kale mumbai print news psg