राज्यातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या कारणांचा अभ्यास करून त्यात सुधारणा सुचविण्यासाठी नेमलेल्या गटाचा अहवाल अभ्यास गटाचे अध्यक्ष डॉ. महेमुदूर रहमान यांनी सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर केला. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान आणि अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव टी. एफ. थेक्केकारा उपस्थित होत्या.
राज्य शासनाने मे २००८ मध्ये हा अभ्यासगट नियुक्त केला होता. केंद्र शासनाचे निवृत्त सचिव व अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. महेमुदूर रहमान या अभ्यास गटाचे अध्यक्ष आहेत. अभ्यास गटात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे प्रा. डॉ. अब्दुल शबान, औरंगाबादच्या सर सैय्यद कॉलेजचे माजी प्राचार्य प्रो. मोहंमद तिलावत अली, निर्मला निकेतनच्या उपप्राचार्य डॉ. फरीदा लांबे, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्रा. डॉ. राणू जैन, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रा. विभूती पटेल आणि डॉ. विणा पुनाचा यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला होता.
या अभ्यास गटाने मुस्लिम समाजातील युवकांचे शासकीय नोकऱ्यांमधील प्रमाण, दलित मुस्लिमांचे प्रश्न, वक्फ मंडळाच्या जागा तसेच मुस्लिम समाजाच्या विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रश्नांचा सखोल अभ्यास केला.
मुस्लिमांमधील आर्थिक, सामाजिक सुधारणांसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल सादर
राज्य शासनाने मे २००८ मध्ये हा अभ्यासगट नियुक्त केला होता. केंद्र शासनाचे निवृत्त सचिव व अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. महेमुदूर रहमान या अभ्यास गटाचे अध्यक्ष आहेत.
आणखी वाचा
First published on: 21-10-2013 at 07:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr mahemudur rehman committee report submitted to state government