मुंबईतील कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलात बनावट लसीकरण केल्या प्रकरणातील आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी अखेर आज(मंगळवार) कांदिवली पोलिसांसमोर शरण आला आहे. या अगोदर त्याने अटकेच्या भीतीने मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती.

लस घोटाळ्याप्रकरणी शिवम रुग्णालयाच्या पटारिया दाम्पत्यास अटक

तसेच, अटकपूर्व जामिनाची मागणी करताना या बनावट लसीकरणामागे ‘शिवम’ रुग्णालय असल्याचा आणि त्याच्या मालकाचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याने पोलीस रुग्णालयाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा दावा केला होता. गेल्या आठवडय़ात हा बनावट लसीकरणाचा प्रकार उघडकीस आला होता. आतापर्यंत फरारी असलेल्या त्रिपाठी याने अटकेच्या भीतीने मंगळवारी दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. अ‍ॅड्. आदिल खत्रीच्या मार्फत त्रिपाठीने हा अर्ज केला होता. आपण पोलिसांना तपासात सहकार्य केल्याचे आणि १५ जूनला जबाबही नोंदवल्याचा दावा त्रिपाठी याने अर्जात केला होता.

दरम्यान, लस घोटाळाप्रकरणी कांदिवली हिरानंदानी हेरिटेजमधील नागरिकांना दिलेल्या बनावट प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या लशींच्या बॅचचा वापर कु ठे के ला त्याची माहिती देण्याचे आदेश २७ रुग्णालयांना पालिकेने दिले आहेत.

लसीकरण घोटाळा: मुंबईत २००० हून जास्त लोकांची फसवणूक; ठाकरे सरकारची हायकोर्टात माहिती

कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेजमधील जवळपास १०० नागरिकांना बनावट लस दिल्याचे समोर आल्यानंतर नानावटी, लाइफ सायन्स आणि गोरगाव नेस्को रुग्णालयाच्या नावाने बनावट प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले होते. यावर कोव्हिशिल्ड लशीच्या चार बॅचचे क्रमांक नमूद केलेले आहेत. या बॅचच्या लशी कोणत्या रुग्णालयांना दिल्या होत्या याची माहिती पालिकेने सीरम इन्स्टिट्यूटकडे पत्राद्वारे मागितली होती. ही माहिती इन्स्टिट्यूटने पालिकेला कळविली आहे.

लसीकरण घोटाळा : हिरानंदानी सोसायटीत झालेल्या लसीकरणाबद्दल BMC नं दिली महत्त्वाची माहिती

बोगस लसीकरण शिबिर आयोजित करणाऱ्या टोळीला अटक   –

कांदिवली इथल्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातल्या नागिरकांनी बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार केली होती. इथे आयोजित लसीकरण शिबिरात प्रतिडोस १२६० रुपये आकारले जात होते. या प्रकरणात आता मुंबई शहरात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करणाऱ्या या टोळीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ८ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून १२ लाख ४० हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ही रक्कम या टोळीने फसवणूक करुन मिळवली होती.

Story img Loader