प्रतिभा आणि सर्जनशीलता या दोन संज्ञा निसर्ग आणि मानवी मनोव्यवहाराशी निगडित आहेत. या दोन संज्ञांबाबत तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि कलावंतांना कमालीचे आकर्षण आहे. परंतु या दोन्ही शब्दांना अनेक अर्थछटा असून त्या उलगडण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘प्रतिभा आणि सर्जनशीलता’ या तब्बल ४०० पानी ग्रंथात लेखक डॉ. सुधाकर देशमुख यांनी अभ्यासपूर्वक आणि संशोधनवृत्तीतून केले आहे. ‘पद्मगंधा प्रकाशन’तर्फे लवकरच हा ग्रंथ प्रकाशित होणार आहे.
प्रतिभा आणि सर्जनशीलता हे शब्द आपण अगदी सहजपणे वापरतो. पण त्यांचा नेमका अर्थ माहिती नसतो. या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात प्रतिभा या संकल्पनेची तोंड ओळख, तिची व्यवच्छेदक लक्षणे आणि सोपी व्याख्या लेखकाने केली आहे. प्रतिभाशक्ती ही मेंदूची शक्ती आहे. आणि ती एक जैविक प्रक्रिया आहे. माणूस जसा उत्क्रांत होत गेला तसा त्यांने अनेक शक्ती गमावल्या, तर काही नेटाने टिकवून ठेवल्या. प्रतिभाप्रक्रियेने जैविक उत्क्रांतीतील आपले स्थान गेली अनेक शतके टिकवून ठेवले. यावरूनच या प्रक्रियेचे जैविक रचनेतील स्थान अधोरेखित होते. जैविक उत्क्रांती, जाणीव विकास आणि शाररिक आणि मानसिक जखम भरून निघण्याच्या क्रिया या सर्व जैविक प्रक्रिया आहे. त्यांचे प्रातिभप्रक्रियेशी असलेली संबंध आपण लक्षात घेतले तर प्रतिभ प्रक्रिया समजण्यास आपल्यात मदत होईल, असे विश्लेषण या पुस्तकात आहे.
भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील प्रतिभा संकल्पना, आधुनिक मानसशास्त्राच्या अंगाने प्रतिमा, सौदर्यशास्त्र आणि प्रतिभा, मेंदूविज्ञान आणि प्रतिभा, प्रतिभा म्हणजे काय?, प्रतिभा आणि उत्क्रांतीशास्त्र, प्रतिभा आणि मानसशास्त्र, प्रतिभा आणि तत्त्वज्ञान, सर्जनशीलता म्हणजे काय, सर्जनशीतेचा सिध्दात आणि प्रक्रिया यातील निरिक्षणे, अशा विविध विषयांचा सांगोपांग उहापोह लेखकाने ग्रंथात केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा