विख्यात नेत्रशल्यचिकित्सक म्हणून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आजपर्यंत १ लाख ६२ हजार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. लाखो रुग्णांना दृष्टी मिळवून देतानाच जे.जे. रुग्णालयातील नेत्र चिकित्सा विभागाचे नाव अटकेपार नेऊन ठेवले. त्याचवेळी हाडाचे शेतकरी असलेल्या डॉ. लहाने यांनी नेत्रविभागालगत सूर्यफुलाच्या शेतीपासून मक्याची कणसे लावून आपली शेती साधना जपली. त्यांनी आता सुंदर बगीचा तयार केला असून त्यात छोटेसे तळे निर्माण केले आहे. आज तेथे अनेक बदके मुक्तपणे विहार करत असतात. अनेक पक्षी या बागेत दिसतात. या बदकांमधील एका अंध बदकाला डॉ. लहाने यांनी उपचार करून दृष्टी मिळवून दिली. याचाच हा आढावा.
VIDEO: नेत्र शल्यचिकित्सक डॉ. लहाने यांनी अंध बदकालाही दृष्टी दिली, व्हिडीओ पाहा…
डॉ. लहाने यांनी एका अंध बदकाला उपचार करून दृष्टी मिळवून दिली. याचाच हा आढावा.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
First published on: 07-12-2021 at 21:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr tatyarao lahane did eye operation of blind duck in mumbai pbs