मालाड-मालवणी येथे अल्पवयीन बहिणीला वेश्या व्यवसायात लोटणाऱ्या या मुलीच्या मोठय़ा बहिणीला आणि तिच्या नवऱ्याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. या विवाहित बहिणीने आपल्या १२ वर्षांच्या धाकटय़ा बहिणीला शिक्षणाच्या निमित्ताने मुरादाबाद येथून मुंबईत आणले आणि जबरदस्तीने तिला वेश्या व्यवसायात लोटले. मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन आणि तिला जीवे मारण्याची धमकी देऊन  बहिणीच्या नवऱ्यानेही या मुलीवर वारंवार अत्याचार केला. पिडित मुलीने आपल्या मोठय़ा भावाशी संपर्क साधला आणि त्याला सगळा प्रकार सांगितला. या भावाने मुंबईतील मित्राची मदत घेऊन मालवणी पोलिसांकडे धाव घेतली व या मुलीची सुटका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Draged sister in prostitution