गेल्या २८ वर्षांत ८० हून अधिक नाटकांची निर्मिती  करणाऱ्या ‘सुयोग’ नाटय़संस्थेचे निर्माते सुधीर भट यांचे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हिंदुजा हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गेली काही वर्षे ते हृदयविकाराने ग्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. मराठी नाटकांचे स्वत:च्या हिमतीवर परदेशांतून, विशेषत: अमेरिकेत प्रयोग करण्याचे धाडस त्यांनी नव्वदच्या दशकापासून सातत्याने केले. काही काळ नाटय़निर्माता संघाचे ते अध्यक्षही होते. अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाचेही प्रदीर्घ काळ ते सदस्य राहिले. नाटय़व्यवसायाच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी शासनदरबारी मांडण्यात आणि त्यांची सोडवणूक करून घेण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे.   
१ जानेवारी १९८५ रोजी सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी ‘सुयोग’ची स्थापना केली. ‘सुयोग’च्या ‘मोरूची मावशी’ या आचार्य अत्रेलिखित पहिल्याच नाटकाने हजाराहून अधिक प्रयोगांचा विक्रम करून संस्थेचा पाया भक्कमपणे रोवला. हजार प्रयोगांचा टप्पा पार करणाऱ्या तब्बल आठ नाटकांची निर्मिती ‘सुयोग’ने केली. अभिनेते प्रशांत दामले आणि ‘सुयोग’ यांचे नाते प्रदीर्घ काळ राहिले.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा