स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मुंबई मेट्रोच्या वतीने खुल्या प्रवर्गातील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘माझी मेट्रो, रंग दे मेट्रो’ असं या स्पर्धेचं नाव होतं. या स्पर्धेत १२ राज्यांतील तब्बल ३४०० कलाकारांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत मुंबईच्या १४ वर्षीय वेदांत शिंदे याचा देखील समावेश होता. वेदांतने ‘मुंबई स्पिरिट’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला साकारली होती. मुंबईचा वेदांत या ३४०० स्पर्धकांमधील सर्वात लहान स्पर्धक असल्याने त्याला ‘विशेष स्पर्धक’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.
Video : मुंबई मेट्रोच्या स्टेशनवर झळकणार १४ वर्षाच्या वेदांतने काढलेलं चित्र
मुंबई मेट्रोच्या 'माझी मेट्रो, रंग दे मेट्रो' या स्पर्धेत भाग घेतलेला १४ वर्षीय वेदांत शिंदे हा सर्वांत लहान स्पर्धक होता.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
First published on: 18-12-2021 at 12:14 IST
TOPICSमहाराष्ट्रMaharashtraमुंबईMumbaiमुंबई न्यूजMumbai Newsमेट्रोMetroमेट्रो ट्रेनMetro Trainस्पर्धाCompetition
+ 2 More
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drawing of 14 year old vedant will be displayed at mumbai metro station pvp