मुंबई : मोबाइलमध्ये गाडीचे छायाचित्र टिपल्याच्या रागातून एका वाहनचालकाने वाहतूक पोलिसालाच मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री मानखुर्द परिसरात घडली. याबाबत मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून वाहनचालकाला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

हेही वाचा <<< आशियाई जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी झोपडपट्टीतील १४ मुलांची निवड; स्पर्धेच्या खर्चासाठी दानशूरांना साद

मानखुर्द वाहतूक विभागात कार्यरत असलेले वाहतूक पोलीस दिनकर जायभाय (३५) रविवारी रात्री मानखुर्द टी जंक्शन परिसरात कर्तव्यावर होते. वाहतुकीचा नियम मोडणाऱ्या एका वाहनाची त्यांनी छायाचित्रे काढली. याच रागातून वाहनचालक समशेर आलम (३५) याने जायभाय यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. हा प्रकार पाहून जायभाय यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी धावून आले. याचदरम्यान समशेरने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलीस आणि इतर पादचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला पकडून मानखुर्द पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.