मुंबई : कांदिवली पूर्व येथे द्रुतगती मार्गावर कचरा वाहून नेणाऱ्या डम्परचा गुरुवारी अपघात झाला. या अपघातात डम्पर चालकाचा मृत्यू झाला. तर डम्परचा क्लिनर जखमी झाला. क्लिनरच्या तक्रारीवरून मृत चालकाविरोधात समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोरिवली (पश्चिम) येथील गोराई परिसरातील कचरा डम्परमधून कांजूर कचराभूमीत टाकण्याचे काम सरफुद्दील अन्सारी (३४) करायचा. अन्सारी काम करीत असलेल्या कंपनीला महानगरपालिकेचे याबाबतचे कंत्राट मिळाले होते. नेहमीप्रमाणे अन्सारी कांजूर कचराभूमीत कचरा टाकून डम्परने परत येत होता. द्रुतगती मार्गावर आक्रुर्ली मेट्रो स्थानकाजवळील दुभाजकावर त्याचा डम्पर धडकला. त्यात अन्सारीच्या पोटाला मार लागला. या अपघातात क्लिनर नफीज शेख (३०) हाही जखमी झाला.

हेही वाचा >>> मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांनाही शताब्दी रुग्णालयात नेले. अन्सारीचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. शेखची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी शेखचा जबाब नोंदवण्यात आला असून त्याने दिलेल्या माहितीनुसार, अन्सारी भरधाव वेगात डम्पर चालवत होता. त्याचे डंपरवरील नियंत्रण सुटले व डम्पर दुभाजकाला धडकला. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे दुभाजकाला धडक दिल्यानंतर डम्पर ४० मीटर दूर घसरत गेला. त्यात अन्सारीच्या पोटाला मारला लागला. याप्रकरणी शेखच्या तक्रारीवरून पोलिसांनी भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी अन्सारीविरोधात गुन्हा दाखल केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driver dies in dumper accident in kandivali mumbai print news ysh
Show comments