मद्यपान करून भरधाव वेगाने मोटारसायकल चालविणाऱ्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेत मोटरसायकलवरील मागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. सांताक्रूझ पूर्व येथील मिलिटरी कॅम्प परिसरात शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
  मनोज कामटे (२२) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. मनोज आणि त्याचा मित्र फहिम कुरेशी (२२) या दोघांनी मद्यपान केले होते. सिगारेट विकत घेण्यासाठी रात्री १ च्या सुमारास ते मिलिटरी कॅम्प परिसरातील गुंजन सोसायटीत आले होते. मात्र मद्याच्या नशेत गाडी चालवताना ती गतिरोधकावर आदळून त्याचे नियंत्रण सुटले आणि मनोजचा मृत्यू झाला.
आम्ही फहिमचा जबाब नोंदविला असून त्याने मद्यप्राशन केल्याचे मान्य केले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील माने यांनी सांगितले.
फहिम पंचतारांकित रुग्णालयात वेटरचे काम करत असून त्याच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा