आतापर्यंत विरुद्ध दिशेने (Wrong Side Driving) गाडी चालवल्यास दंड आकारला जात होता, मात्र नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशानुसार आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात येत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी नवभारत टाइम्सला सांगितले की, गेल्या ४८ तासात मुंबईत आयपीसीच्या कलम २७९ आणि १८४ अंतर्गत ५० हून अधिक केस चुकीच्या पद्धतीने चालवल्याबद्दल नोंदवण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांत हेल्मेट न घालता दुचाकी आणि स्कूटर चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिस चांगलीच कारवाई करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मोबाईल चोरीबाबत सूचना

आतापर्यंत मोबाइल चोरीप्रकरणी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार सहसा घेतली जात होती, मात्र संजय पांडे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना मोबाइल चोरीप्रकरणीही एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. पांडे यांनी आपल्या अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, नुसती लेखी तक्रार करून काम होणार नाही.

(हे ही वाचा: टोयोटाची सर्वात स्वस्त कार, न्यू जेनरेशन Toyota Glanza ची प्री-लाँच बुकिंग सुरू!)

महिला पोलिसांची आठ तास ड्युटी

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईतील महिला पोलिसांना मोठी भेट दिली आहे. त्यांनी आठ मार्चपासून महिला दिनानिमित्त सर्व महिला पोलिस कॉन्स्टेबलची ड्युटी १२ तासांवरून ८ तासांवर आणली आहे. डीजीपी पांडे या नात्याने यासंदर्भात संपूर्ण राज्यासाठी हा आदेश काढण्यात आला होता, मात्र आजतागायत मुंबईत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्याची अंमलबजावणी केवळ नागपूर शहर, अमरावती, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबईत करण्यात आली.