मुंबईकरांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ड्रॉप बॉक्समधील धनादेशांतील तपशील मिळवून दोन तरुणांनी तीन कंपन्यांना सुमारे ३३ लाखांचा गंडा घातला आहे.
भविष्यात आपल्याकडे असलेल्या तपशिलांचा वापर करून मोठय़ा प्रमाणावर गंडा घालण्याचा त्यांचा डाव होता, ही गंभीर बाब गुन्हे अन्वेषण विभागाच्या दहिसर युनिटच्या तपासातून उघड झाली आहे. मे. आर. पी. लद्दा, सिंक सोल्युशन्स आणि जय एन्टरप्राइझेस या तीन कंपन्यांना अनुक्रमे १४ लाख, साडेपाच लाख आणि १५ लाख रुपयांचा गंडा घातला गेला आहे. खऱ्या धनादेशांवर बनावट सहय़ा करून आरटीजीएस यंत्रणेद्वारे पैसे अदा करण्यात आल्याची तक्रार आल्यानंतर तेजप्रसाद हौसलाप्रसाद मिश्रा ऊर्फ बबलू (३१) आणि सचिन जनार्दन मिश्रा (३१) या दोन तरुणांना अटक केली. या दुकलीने तब्बल ४०० हून अधिक कंपन्यांचा तसेच काही हाय प्रोफाइल ग्राहकांचाही तपशील मिळविला होता, असे स्पष्ट झाले आहे.
‘ड्रॉप बॉक्स’मधील धनादेश गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून धनादेशांच्या झेरॉक्स या दुकलीने मिळविल्या. त्यानंतर राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमधील कंपन्यांची चालू खात्यांची यादी तयार केली. खासगी बँका ग्राहक ओळख क्रमांक वा इतर तपशील सांगितल्याशिवाय खात्यातील शिल्लक रक्कम वा धनादेश पुस्तिका जारी करीत नाहीत, याची कल्पना असलेल्या या दुकलीने शक्कल लढवून बँकेतील गर्दीचा फायदा उठविण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी या पैशाच्या बदल्यात सोने खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा