अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) बुधवारी १०० कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी माजी वैमानिक सोहेल गफार महिदासह दोघांचा ताबा घेतला. फोर्ट परिसरातून जप्त करण्यात आलेल्या ४९ किलो मेफेड्रॉन(एमडी) प्रकरणी गुजरातमधून दोघांचाही ताबा घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>“गुजरातमध्ये आचारसंहितेची ऐशी की तैशी करत पंतप्रधान…”, ‘भारत जोडो’ यात्रेच्या स्थगितीवरून शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र

Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
pune steroid injections
पुणे : स्टेरॉईड इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री, दोन जणांवर गुन्हा दाखल
ACB arrested Municipal Corporation officer Mandar Tari for demanding two crore bribe
लाच मागितल्याप्रकरणी पालिका अधिकाऱ्याला अटक
badshah traffic violation allegation
बादशाहवर वाहतुकीचे नियम मोडल्याने झाली कारवाई? रॅपर स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाला, “माझ्याकडे तर…”
harnai port diesel seized
हर्णै बंदरात दापोली पोलिसांनी नौकेत ३० हजार लिटर अवैध डिझेल साठा पकडला
team of Crime Investigation Branch of Thane Police seized drug stocks worth over Rs 10 lakh in two separate cases
१० लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
crime branch arrests gangster with illegal pistol in dari pool area
गुंडाकडून दोन पिस्तूले, सहा काडतुसे जप्त; बाह्यवळण मार्गावरील दरी पूल परिसरात कारवाई

एनसीबीच्या पथकाने ६ ऑक्टोबरला एसबी पथ, फोर्ट, मुंबई येथे असलेल्या एका गोदामातून सुमारे ४९ किलो एमडी जप्त केले होते. त्यावेळी याप्रकरणी मोहम्मद खत्री व फारुख खत्री यांना अटक करण्यात आली होती. चौकशीत खत्रीने मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या प्रेमप्रकाश सिंह यांच्याकडून अंमलीपदार्थ घेतल्याचे सांगितले. रसायनशास्त्र पदवीधर असलेल्या सिंह याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने(एएनसी) गेल्यावर्षी २५०० किलो एमडी जप्त करून विक्रमी कारवाई केली होती. सिंहने पालघर व गुजरातमध्ये एमडीची निर्मिती करून देशभर त्याचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले. एएनसी प्रकरणात न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर एएनसीने ४९ किलो एमडी तस्करी प्रकरणी सिंहचा ताबा घेतला होता. त्यानंतर एनसीबीने याप्रकरणी शौकत मियाँ चौधरी नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. चौधरीने चौकशीत मुथू दास व वैमानिक महिदा यांना अंमली पदार्थ पुरवल्याचे सांगितले होते. अखेर बुधवारी याप्रकरणी एनसीबीने महिदासह दास या दोघांचाही गुजरातमधून ताबा घेतला.

हेही वाचा >>>‘समृद्धी’वर १० दिवसांत २९ अपघात; एकाचा मृत्यू, ३३ जखमी

एनसीबीने अंमली पदार्थ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या सोहेल गफार महिदा याने एअर इंडियामध्ये २०१६ ते २०१८ या काळात वैमानिर म्हणून सेवा बजावली होती. त्याने सॅन अँटोनियो, टेक्सास, यूएसए आणि लिथुनिया येथून उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. जामनगर आणि मुंबईत परिसरात ही टोळी कार्यरत होती.

Story img Loader