केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या घटनेचे पडसाद रविवारी दिवसभर उमटल्याचं दिसून आलं. या प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसहीत आठ जणांना एनसीबीने अटक केली. एनसीबीचे हेच धाडसत्र सोमवारी पहाटेही सुरु होतं. याच प्रकरणासंदर्भात मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत अमली पदार्थ पुरवणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

एनसीबीने रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत वेगवेगळ्या वेळी वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला या ठिकाणी छापेमारी करत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्याला ताब्यात घेतल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. आता अमली पदार्थ पुरवणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याने कोणाच्या माध्यमातून आणि कशापद्धतीने हे अमली पदार्थ पुरवले जातात यासंदर्भातील पुरवठा साखळी आणि इतर महत्वाची माहिती एनसीबीच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतरांना न्यायालयासमोर आज हजर करणार…
दरम्यान रविवारी करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सविस्तर माहिती दिली. आरोपींकडून चार विविध प्रकारच्या अमली पदार्थासह सुमारे दीड लाखाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आर्यनसह तिघांना रविवारी न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना ४ ऑक्टोबपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. उर्वरित आरोपींना सोमवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.

काय काय सापडलं?
आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर ‘एनसीबी’ने शनिवारी ही कारवाई केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले आहेत. सशयितांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. 

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
First photo of saif ali khan attacker
PHOTO: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा पहिला फोटो आला समोर
Saif Ali Khan attacker identified says police
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या
Saif Ali Khan And Arvind Kejriwal
Saif Ali Khan : “गुजरातच्या तुरुंगात बसलेला गुंड…” सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव घेत केजरीवालांकडून भाजपा लक्ष्य
Saif Ali Khan Attacked With Knife At Home
Saif Ali Khan Attacked : “सैफ अली खानच्या घरात घुसलेला आरोपी हा…”, डीसीपी गेडाम यांनी दिली महत्त्वाची माहिती
Police Suspects Saif Ali Khan House Helper knew Attacker
हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय; दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…
Encounter Specialist Daya Nayak Arrives at Saif Ali Khan home
Video: एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पोहोचले सैफ अली खानच्या घरी, तपासाचा व्हिडीओ आला समोर

गुन्हा दाखल
‘एनसीबी’ने आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर नवी मुंबईसह आणखी काही ठिकाणी शोधमोहीम राबवून संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली आणि एकाला ताब्यात घेण्यात आले. रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या आठ जणांना ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील कार्यालयात आणले आणि त्यांना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

रविवारची रात्र एनसीबीच्या कार्यालयातच
अरबाज आणि आर्यन दोघेही एकाच खोलीत राहात होते. आर्यनवर सेवनाचा, तर उर्वरित दोघांवर अमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे. जे. जे. रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करून आर्यन, अरबाज आणि मूनमून धमेचा यांना सायंकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली.  तीनही आरोपींना सोमवारी दुपारी पुन्हा न्यायालायापुढे हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्यन खानसह मूनमून आणि अरबाज यांना रविवारची रात्र एनसीबीच्या कार्यालयातच घालवावी लागली. या कारवाईसंदर्भात कोर्डेलिया क्रूझचे मालक जुर्गेन बैलोम म्हणाले, की या प्रकरणाशी  कोर्डेलिया क्रूझचा कोणताही संबंध नाही. आम्ही अशा कृत्यांचा निषेध करत असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्नशील राहू.

कारवाईसाठी प्रवासी असल्याची बतावणी
रेव्ह पार्टीची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली होती. त्यानुसार छापा घालण्यासाठी २० अधिकाऱ्यांचे पथक प्रवासी असल्याची बतावणी करून क्रूझवर दाखल झाले होते. या पथकाने आठ संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर उर्वरित प्रवाशांना क्रूझमधून प्रवासाची मुभा देण्यात आली. 

आरोपींमध्ये कोणाचा समावेश?: आर्यन खानसह, मूनमून धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाज र्मचट यांना अटक करण्यात आली आहे.

Story img Loader