मुंबई: आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ तस्कर कैलास राजपूतचा साथीदार अली असगर शिराजीप्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) देशभरात १३ ठिकाणी छापे टाकले असून त्यात मुंबई, लखनऊ, दिल्ली व अहमदाबाद येथील ठिकाणांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडीने ५ जानेवारी रोजी शिराजीला अटक केली होती. त्यावेळी चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई, लखनऊ, दिल्ली व अहमदाबाद येथील १३ ठिकाणी ईडीने छापे टाकले. त्यात दोन कोटी १७ लाख रुपयांची रोख रक्कम व मुदत ठेवींबाबतची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय मोबाइल, लॅपटॉप व महत्त्वाची कागदपत्रे ईडीने जप्त केल्याचे सांगितले.

हेही वाचा – कामाठीपुरा पुनर्विकास : सल्लागार म्हणून काम पाहण्यासाठी तीन कंपन्या उत्सुक

एअर कार्गोमध्ये लपवून आठ कोटी रुपयांच्या इफेड्रिनची ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये तस्करी केल्याप्रकरणी कैलाश राजपूतचा हस्तक अली असगर परवेझ आगा शिराजी याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २२ मे रोजी अटक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. त्याच्याविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते. तो दुबईला जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र मुंबई विमानतळ प्राधिकरणाने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटकेपूर्वी सहा महिन्यांच्या कालावधीत या टोळीने ७२ वेळा अंमलीपदार्थ परदेशात पाठवला होता. याप्रकरणी शिराजीव्यतिरिक्त आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ तस्कर कैलाश राजपूतसह तिघांबाबत एलओसी जारी केले आहेत. संपूर्ण तस्करी राजपूतच्या इशाऱ्यावर करण्यात आली आहे.

हेही वाचा – शेकोटी, पालापाचोळा जाळल्यामुळे देवनारमधील हवा प्रदूषित

मुख्य आरोपी शिराजीने अंमलीपदार्थांद्वारे कमवलेला पैसा युरोप व ऑस्ट्रेलियामध्ये पाठवल्याचा आरोप आहे. त्या माहितीच्या आधारे ईडीने नवा गुन्हा दाखल केला होता. यापूर्वीही ईडीने याप्रकरणी ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबईतील १० ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी रोख रक्कम व दागिने असा ६२ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल ईडीने जप्त केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drug trafficker ali asgar shirazi case ed raids at 13 locations across the country mumbai print news ssb
Show comments