लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई: अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) मुंबईत राबवलेल्या विशेष कारवाईत आतापर्यंत अडीच कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले असून याप्रकरणी १४ गुन्ह्यांमध्ये २१ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय एएनसीने केलेल्या तीन कारवायांमध्ये २५ लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले आहे. याशिवाय ई-सिगारेटच्या गोदामावर कारवाई करण्यात आली असून त्यात ई-सिगरेटचा साठा जप्त करण्यात आला आहे.

122 citizens suffer during ganpati immersion procession due to crowding and heat
Ganpati Visrajan : गर्दी आणि उन्हामुळे विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना त्रास; पहिल्या चार तासांत १२२ जणांवर उपचार
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Food and Drug Administration seized 285 liters of adulterated milk in Mumbai news
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई
Navi Mumbai, vehicle repair,
नवी मुंबई : वाहन दुरुस्ती, सुटे भाग विक्री दुकानदारांवर धडक कारवाई
sndt canceled published recruitment advertisement due to doubtful in reservation provisions
पद भरतीची जाहिरात रद्द, उमेदवारांना मात्र हजार रुपयांचा भुर्दंड
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
Pune, cyber thieves, cyber crime in pune, fear tactics, extortion, woman, thermal imaging, undress, complaint
सायबर चोरट्यांची हिम्मत वाढली; तपासणीच्या नावाखाली महिलेचा विनयभंग
Nagpur, cyber crime, financial fraud, sextortion, Maharashtra, Mumbai, Pune, Nagpur, trained staff, cyber police, public awareness, cyber crime news
सायबर गुन्हेगार ग्राहकांना जाळ्यात अडकविण्यासाठी करतायेत तरुणींचा वापर; दिवसाला शेकडोंवर…

ट्रॉम्बे चिताकॅम्प परिसरात ई-सिगारेटचे गोदाम असून तेथे ई सिगारेटची विक्री, लिक्वीड फ्लेवर्सचा वापर करून ई सिगारेट पुन्हा रिफील करण्यात येतात. तसेच त्यांची बॅटरी पुन्हा रिअसेंबल करण्यात येत असल्याची माहिती एएनसीच्या आझाद मैदान कक्षाला मिळाली होती. या गोदामावर छापा टाकून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या गोदामातून ३०१ ई – सिगारेट, वापरून रिकाम्या झालेल्या ४०२ ई – सिगारेट, १३० ई – सिगारेटच्या बॅटऱ्या व फिल्टर्स, ३०३ ई सिगारेट फ्लेवर्स बाटल्या, ई – सिगारेटच्या बॅटरीचे ९ चार्जर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एकूण पाच लाख रुपये आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा २०१९ कलम ७ व ८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आणखी वाचा- मुंबई: आंदोलन केल्यामुळे वसतिगृह सोडण्याचे आदेश?

दहिसर पश्चिम येथील कांदरपाडा परिसरात करण्यात आलेल्या अन्य कारवाईमध्ये दोघांना अटक करण्यात आली. आरोपीकडून ७७ ग्रॅम वजनाचे ‘एम. डी’ (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले असून त्याची किंमत १५ लाख ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी कांदिवली कक्षात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या कारवाईत वरळी कक्षाने माझगाव येथून एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून ४६ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत १० लाख रुपये आहे.

मागील १५ दिवसांत अंमलीपदार्थ विरोधी कक्षाने विशेष मोहिमेदरम्यान यशस्वीरित्या एकूण १४ गुन्हे नोंद केले असून एकूण २१ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ८४९ ग्रॅम एम. डी., १ किलो २३० ग्रॅम चरस, ९२.४ ग्रॅम हेरॉईन, २८० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा असा सुमारे दोन कोटी ६० लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आणखी वाचा- ५० लाखांच्या महारेरा वसुलीसाठी दीड कोटींच्या सदनिकेचा लिलाव

मुंबईसह अन्य ठिकाणच्या पोलीस ठाण्यांनी केलेल्या कारवाईत अंमलीपदार्थांसह १७ आरोपींना अटक करण्यात आली. याशिवाय बेकायदेशिररित्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी कोप्टा कायद्याअंतर्गत ४०७ कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच ६६ अनधिकृत टपऱ्यांचे निष्कासन करण्यात आले आहे.