लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून ६४ कोटी ३६ लाख रूपयाच्या अंमलीपदार्थ सोमवारी नष्ट केले. यावेळी केंद्रीय गृह अमित शाह यांच्या व्हर्चुअल उपस्थितीत ‘ड्रग्स ट्राफिकिंग अॅण्ड नॅशनल सिक्युरिटी’ या विषयावर दिल्ली येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
आणखी वाचा-मुंबईः मार्वे समुद्रात बुडालेल्या एका मुलाचा मृत्यू
या परिषदेच्या आयोजनादरम्यान अमित शाह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे नष्ट करण्यात येणाऱ्या मालाचा आढावा घेतला. त्यावेळी दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी ४ गुन्हयांमध्ये जप्त केलेला एकूण १६१ किलो वजनाचे (अंदाजे किंमत ६४ कोटी ३६ लाख रूपये) अंमलीपदार्थ नवी मुंबईतील तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी लि. बंदीस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट करण्यात आले. दहशतवाद विरोधी पथकाचे महासंचालक सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे यांच्या उपस्थित अंमली पदार्थ नाश समितीच्या अध्यक्षा पोलीस अधिक्षक (गुप्तवार्ता) शीला साईल, अंमली पदार्थ नाश समितीचे सदस्य उपस्थित ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.