मुंबईच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे भाषण करताना सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणांवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं भाषण मध्येच थांबवण्यात आलं. सुप्रसिद्ध कलाकार प्रभाकर बर्वे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नॅशलन गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी, आर्ट गॅलरीने आपलं स्वातंत्र्य कसं गमावलं, याबद्दल पालेकर बोलत होते. शनिवारी हा संतापजनक प्रकार घडला.
भाषण करताना पालेकर यांनी कशा पद्धतीने वर्तमान काळात आर्ट गॅलरींनी स्वतःचे स्वातंत्र्य गमावलंय. शिवाय, त्यांनी आर्ट गॅलरीच्या कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यादरम्यान, पालेकरांनी नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या एका सल्लागार समितीचा उल्लेख केला. या समितीमध्ये स्थानिक कलाकारांचे प्रतिनिधित्व असायचे. पण, आता या समितीला थेट संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणांतर्गत आणले गेल्याचे पालेकरांनी कार्यक्रमात सांगितले.
‘द वायर’ वेबसाइटच्या वृत्तानुसार, गॅलरीच्या कामकाजावर आपली परखड मतं मांडत असतानाच मंचावर उपस्थित असलेल्या आयोजक आणि समन्वयकांनी त्यांना भाषणाच्या मध्येच टोकायला सुरुवात केली. “तुम्ही हे बोलू शकत नाही. कृपया बर्वेंबद्दलच बोलावे,” असं त्यांना यावेळी सांगण्यात आलं. अखेर अमोल पालेकरांनी “तुम्ही मला भाषण द्यायला बोलावलं आणि आता मला बोलण्यापासून रोखत आहात? असंच प्रकरण काही दिवसांपूर्वी नयनतारा सहगल यांच्याबाबतीत झालं होतं,” असं म्हणत पालेकर यांनी समन्वयकांना नक्की काय हवंय, अशी विचारणाही केली. तेव्हा समन्वयकांनी त्यांना भाषण आटोपतं घ्यायला सांगितलं.
पाहा व्हिडीओ –
This is so shocking, veteran actor Amol Palekar being disrupted, not allowed to speak. Veteran actor Palekar retorted: “Are you trying to stop me from speaking and applying censorship on my speech?” pic.twitter.com/m5IxmRr8In
— MumbaiCongress (@INCMumbai) February 9, 2019