मुंबई : नोव्हेंबर २०२४ च्या अखेरीस मध्यम आकारातील सरंगा ८०० रुपयांना मिळत होता. डिसेंबरअखेरीस समुद्रातील दृश्यमानता घटल्याने मासळी उत्पन्नात घट होऊन सरंग्याच्या दरात अडीच पट वाढ होऊन तो दोन हजार रुपयांवर पोहोचला आहे. सरंगा आणि सुरमई मासळीच्या दरातील ही वाढ ३५ ते ४० टक्के इतकी आहे.

हिवाळ्यात मासळीच्या दरातील ही वाढ सुमारे ६० टक्क्यांच्या आसपास असते. मात्र, या मोसमात धुरक्यामुळे समुद्रातील दृश्यमानता कमी झाल्याने मासेमारी बोटींना १०० सागरी मैल इतका टप्पा पार करून खोल समुद्रात मासेमारी करावी लागत आहे. खोल समुद्रातील मासेमारीचा टप्पा जितका वाढेल, तितके बोटीला लागणारे इंधनही जास्त लागते. याआधी समुद्रात १५ ते २० सागरी मैलांवर मासळी जाळ्यात येत होती. पाच दिवसांसाठी १,२०० लिटर डिझेलची आवश्यकता भासते. आता या काळात मत्स्य उत्पादनासाठी दहा दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे खर्चात वाढ होत आहे. परिणामी मासळी दरात वाढ झाल्याचे मच्छिमार संघटनेचे प्रमुख देवेंद्र तांडेल यांनी सांगितले.

Janshatabdi Tejas and Mangaluru Express will run only till Thane and Dadar
कोकणातील तीन रेल्वेगाड्या ठाणे, दादरपर्यंत धावणार
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Mumbais air quality is poor According to Sameer app
शिवाजीनगर घुसमटलेलेच
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
45 lakh fraud occurred claiming college admission
सिंधुदुर्गातील राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचे भासवून, वैद्यकीय प्रवेशासाठी ४५ लाखांची फसणूक
mobile toilets burnt loksatta news
मुंबई : ॲण्टॉप हिल येथे दहा शौचालये जाळली, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Dadar Ratnagiri passenger closed and during that time Dadar Gorakhpur train
दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून गोरखपूरला नवी गाडी
police employee threatened and extorted shopkeepers in Azad Maidan area
बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याची दुकानदारांना धमकावत वसुलीआरोपी अटकेत

हेही वाचा – कोकणातील तीन रेल्वेगाड्या ठाणे, दादरपर्यंत धावणार

u

s

थंडीच्या काळात मासळीच्या दरात ५० ते ६० टक्क्यांनी वाढ होते. मात्र, यंदाच्या वर्षी यात आणखी दहा टक्क्यांनी अर्थात एकूण वाढ ७० टक्क्यांवर गेली आहे. एक हजार ते १२०० रुपयांना मिळणारा मोठ्या आकारातील सरंगा दोन हजार रुपयांच्या पुढे गेल्याचे तांडेल म्हणाले. गेले दहा ते १५ दिवस दाट धुक्याची चादर पसरल्याने मच्छीमारांना अधिक खोल समुद्रात जावे लागत आहे. शिवाय, बोटी उशिरा येत असल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी बोटींच्या खर्चात वाढ झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले.

हेही वाचा – सिंधुदुर्गातील राजकीय नेत्याचा नातेवाईक असल्याचे भासवून, वैद्यकीय प्रवेशासाठी ४५ लाखांची फसणूक

बर्फ, मजुरीच्या खर्चातही वाढ

डिझेलसाठी सुमारे १ लाख १४ हजार रुपये खर्च येतो. यामुळे नेहमीपेक्षा डिझेलच्या खर्चात सुमारे ५० हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच बर्फ आणि मजुरीतही वाढ झाली आहे. बर्फाचा टनामागील दर २,२२० रुपयांवर गेला आहे. अतिरिक्त पाच दिवसांसाठी बर्फासाठी ३३ हजार रुपये खर्च येत आहे. मासळीचा दर वाढण्यामागे हेही प्रमुख कारणे आहे. किंबहुना येत्या काळात मासळीचे दर आणखी भडकण्याची भीती तांडेल यांनी व्यक्त केली.

Story img Loader