मुंबई : वेतन वेळेवर मिळत नसल्यामुळे बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी असहकाराची भूमिका घेत काम बंद आंदोलन केले. कंत्राटदार आणि कंत्राटी कर्मचारी त्यांच्यातील वाद विकोप्याला गेल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद करून आंदोलन पुकारले. परिणामी, या दोघांच्या वादाचा प्रवाशांना फटका बसला. बेस्ट बस सेवेवर मर्यादा येत असल्याने, बेस्टच्या प्रवासी वर्गात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई सेंट्रल आगारातील ओलेक्ट्रा बस चालकांनी शुक्रवारी वेतनाच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. पहाटे ५ वाजल्यापासून सुमारे ९५ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने बस सेवा मंदावली. त्यामुळे सकाळच्या सुमारास कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अनेकांनी जादा पैसे मोजून पर्यायी वाहतूक सेवेचा वापर केला. तर, बेस्ट प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट उपक्रमाच्या बस चालकांच्या मदतीने सर्व बस मार्गाचे प्रवर्तन करण्यात आले. दरम्यान, ओलेक्ट्रा बस चालकांचे काम बंद आंदोलन दुपारी २ वाजता मागे घेण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to non payment of wages on time contract employees of best went on strike on friday mumbai print news sud 02