पूजेच्या साहित्यावरील जकातीत मुंबई महापालिकेने ४.५ टक्क्यांची कपात केली आहे. यापुढे पूजेच्या साहित्यावर केवळ १ टक्के जकात लावण्यात येणार आहे. त्यामुळे पूजेच्या साहित्याच्या दरांमध्येही कपात होणार आहे.
अबीर, गुलाल, कुंकू, कापूर, अगरबत्ती आणि धूप आदी पूजा साहित्यावर महापालिकेकडून ५.५ टक्के जकात वसूल करण्यात येत होता. धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येणारे हे साहित्य स्वस्तात उपलब्ध व्हावे, त्यासाठी त्यावरील जकात कमी करावी, अशी मागणी केली जात होती. त्यामुळे पूजा साहित्यावर १ टक्के जकात कर आकारण्यात यावा असा ठराव जानेवारी महिन्यात महासभेत मंजूर करण्यात आला. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर प्रशासनाने ७ फेब्रुवारीपासून पूजा साहित्यावर १ टक्के जकात आकारण्यास सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to octroi tax reduction worship equipment became cheap