मध्य रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका लांबपल्ल्याच्या प्रवाशांना बसला आहे. सोलापूर विभागाच्या दौंड – कुरुडवाडी विभागादरम्यान २५ जुलैपासून तांत्रिक कामांनिमित्त ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र या कामासाठी मुंबईसह सोलापूर, तसेच अन्य काही विभागांतील मेल, एक्स्प्रेस रद्द कराव्या लागल्या आहेत. परिणामी, चार महिन्यांपूर्वी आरक्षण करूनही अचानक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा ब्लॉक २५ जुलैपासून सुरू झाला असून ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुरू राहील. या काळात रुळाखाली स्लिपर बसविणे, रूळाच्या छेदनस्थळी असलेले ट्रॅक सर्किट बदलणे इत्यादी कामासाठी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामासाठी २५ आणि २६ जुलै रोजी दादर-पंढरपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती. आता ३० जुलै आणि १ ऑगस्टची ही गाडी रद्द करण्यात आली आहे. तर गडद एक्स्प्रेससह अन्य काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. एलटीटी-विशाखापट्टणम ही गाडी अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. सुमारे २५ हून अधिक गाड्या रद्द करतानाच काहींचे मार्गही बदण्यात आले आहेत. याची दोन – तीन दिवसांपूर्वी माहिती मिळाल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. एक्स्प्रेस गाड्यांचे चार महिनेआधी आरक्षण करावे लागते. या गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना वाहतुकीसाठी दुसरा पर्याय शोधतानाही बराच मनस्ताप सहन करावा लागला.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

  • १८ ऑगस्टपर्यंत गाडी क्रमांक ११४२२ / ११४२१ पुणे – सोलापूर- पुणे डेमु
  • १८ ऑगस्टपर्यंत गाडी क्र. १२१६ ९/ १२१७० सोलापूर -पुणे – सोलापूर
  • २ ऑगस्ट गाडी क्र. २२८८२ भुवनेश्वर – पुणे एक्सप्रेस (साप्ताहिक- मंगळवार )
  • ४ ऑगस्ट गाडी क्र. २२८८१ पुणे- भुवनेश्वर एक्सप्रेस (साप्ताहिक-गुरुवार )
  • २७ जुलै आणि ३ ऑगस्ट गाडी क्र. २२६०१ चेन्नई – साईनगर शिर्डी एक्सप्रेस (साप्ताहिक-बुधवार )
  • २९ जुलै आणि ५ ऑगस्ट गाडी क्र. २२६०१ साईनगर शिर्डी- चेन्नई एक्सप्रेस (साप्ताहिक-शुक्रवार )
  • ३१ जुलै आणि ७ ऑगस्ट गाडी क्र. अहमदाबाद – यशवंतपूर एक्सप्रेस (साप्ताहिक-रविवार )
  • २ ऑगस्ट आणि ९ ऑगस्ट गाडी क्र. १६५०१ यशवंतपूर- अहमदाबाद एक्सप्रेस (साप्ताहिक-मंगळवार )
  • २९ आणि ३१ जुलै गाडी क्रमांक ११०२७ दादर – पंढरपूर एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक –सोमवार, शुक्रवार आणि रविवार )
  • ३ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी गाडी क्र.११०२८ पंढरपूर- दादर एक्सप्रेस (त्रि-साप्ताहिक –सोमवार, मंगळवार आणि शनिवार)
    मार्ग परिवर्तन
  • ९ ऑगस्टपर्यंत गाडी क्र. १८५२० लोकमान्य टिळक टर्मिनल- विशाखापट्टनम् एक्सप्रेस व्हाया पुणे, मिरज, कुर्डुवाडी मार्गे धावेल.

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती प्रवाशांना भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून देण्यात आली आहे.त्यांना तिकिटाचा पूर्ण परतावा देण्यात येईल. शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to traffic block in solapur section mail express services were cancelled plight of passengers mumbai print news amy