व्यावसायिक विनोद ब्रोकर यांचा जुहूतील ४० कोटी रुपये किमतीचा आलिशान बंगला हडप करण्यासाठी मारेकऱ्यांनी त्यांचा डमी उभा केला होता, अशी माहिती या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून उघड झाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आणखी एकाला अटक केल्यानंतर ही माहिती बाहेर आली.
  ब्रोकर यांच्या मालकीचा जुहू येथील जानकी कुटिर परिसरात बंगला आहे. मात्र ते पुण्याला राहत होते. त्यांना जुहूचा बंगला विकायचा होता. त्यासाठी इब्राहिम आणि रवींद्र या दोघांनी ब्रोकर आणि त्यांची सेक्रेटरी उषा नायर यांना मुंबईला नेण्याच्या बहाण्याने चालत्या गाडीमध्ये ३० एप्रिल रोजी हत्या केली. या प्रकरणी ब्रोकर आणि नायर गायब झाल्याची तक्रार पुणे येथील पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.मात्र इब्राहिमवर संशय असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सापळा रचून इब्राहिम इस्माईल शेख व रवींद्र शंकर रेड्डी यांना अटक केली. त्यांना मात्र ब्रोकर आणि नायर यांच्या हत्येप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने नितीन भाटिया (५१) याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून जुहूचा बंगला हडप करण्यासाठी विनोद ब्रोकर यांचा डमी तयार करण्यात आला होता, अशी माहितीही समोर आली.

Story img Loader