भारतात बनावट नोटांचा व्यवहार करणारी टोळी बांगलादेशातील चित्रपट उद्योगात हा पैसा गुंतवत असल्याची प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे. युनिट १२ ने ऑक्टोबरमध्ये मुंबईत बनावट नोटा बाळगणाऱ्या तिघांना अटक केली होती. त्यात एका महिलेचाही समावेश होता. या टोळीचा म्होरक्या अब्दुल सत्तार अकबर (२२)याला पश्चिम बंगालमधून तर याच प्रकरणात पोलिसांनी बबलू खुर्शिद शेख (२८) याला अटक केली आहे. बबलू अभिनेता असून त्याने बांगलादेशात एका चित्रपटाची निर्मिती केली असून त्यात भूमिका केली आहे. बनावट नोटांच्या तस्करीतून आलेला पैसा या चित्रपटाच्या निर्मितीसाठी वापरण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  बनावट नोटा भारतात आणून  किरकोळ विक्रेत्यांकडे वटवल्या जात होत्या. त्या मोबदल्यात या एजंटना वीस टक्के कमिशन मिळत असे. या नोटा वटविण्यासाठी बांधकाम मजूर  तसेच महिलांचाही वापर होत असल्याचे पहिल्यांदाच निदर्शनास आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद खेतले यांनी दिली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा