‘गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ’ आणि ‘विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २७ जानेवारी या कालावधीत विजयदुर्ग येथे ‘तिसरे दुर्ग साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. माजी नौदल अधिकारी व्हाईस अॅडमिरल मनोहर आ़वटी हे संमेलनाध्यक्ष तर राघोजी आंग्रे हे स्वागताध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे या संमेलनाच्या निमित्ताने नौदलातर्फे एक लढाऊ जहाज दोन दिवस विजयदुर्ग किनाऱ्याजवळ नांगरण्यात येणार आहे.
हे जहाज आणि त्यावरील प्रदर्शन हे यंदाच्या संमेलनाचे खास आकर्षण आहे. तसेच संमेलनाच्या निमित्ताने भारतीय पुरातत्व विभागाच्या किल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शन, भास्कर सगर यांचे कोकण चित्र प्रदर्शन, सचिन मगजे यांचे गोव्यातील किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन या ठिकाणी असणार आहे.
संमेलनात मराठय़ांचे आरमार, दुर्गसाहित्याचा प्रवास, शोध किल्ल्यांचा, दुर्गसंवर्धन चळवळ आदी परिसंवाद तसेच निनाद बेडेकर यांचे ‘विजयदुर्गचे रहस्य’, विजयदुर्गला नावेमधून प्रदक्षिणा, दशावतारी नाटक, गिरिप्रेमी संस्थेचा एव्हरेस्ट मोहिमेवरील चित्रपट व मोहिमेत सहभागी झालेल्यांचा सत्कार आदी कार्यक्रमही होणार आहेत. डॉ. गजानन मेहेंदळे, पांडुरंग बलकवडे, डॉ. वीणा देव, आनंद देशपांडे, आनंद पाळदे आणि अन्य मान्यवर संमेलनातील विविध परिसंवादात वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, शिवप्रतिमा मिरवणूक, ढोल पथकांचे खेळ होणार आहेत.
संमेलनाबाबत अधिक माहितीसाठी प्रसाद देवधर यांच्याशी ९४२३०५१७१४ या क्रमांकावर किंवा फेसबुकवर दुर्ग साहित्य संमेलन या पेजवर याविषयी सविस्तर माहिती मिळू शकेल.
आजपासून विजयदुर्ग येथे दुर्ग साहित्य संमेलन
‘गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ’ आणि ‘विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २७ जानेवारी या कालावधीत विजयदुर्ग येथे ‘तिसरे दुर्ग साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. माजी नौदल अधिकारी व्हाईस अॅडमिरल मनोहर आ़वटी हे संमेलनाध्यक्ष तर राघोजी आंग्रे हे स्वागताध्यक्ष आहेत.
First published on: 25-01-2013 at 03:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Durg sahitya sammelan at vijaydurg