मुंबई : सध्या बाजारपेठेत महागाई असली तरी दसरा-दिवाळीनिमित्त अनेक उत्पादनांवर सूट आणि सवलती देण्यात येत आहेत. याचा फायदा घेत ग्राहकांनी इलेकट्रॉनिक वस्तू, वाहने, घर आणि सोने खरेदीसाठी विजयादशमीचा मुहूर्त साधला. सोन्याच्या किंमतीत वाढ झाली असतानाही गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसला. तसेच दसऱ्याचे औचित्य साधून गृहविक्री, नोंदणी, घरांचा ताबा किंवा गृहप्रवेश यातही ग्राहकांचा उत्साह दिसला.

इस्रायलच्या पॅलेस्टाईनवरील हल्ल्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये पडझड झाल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. असे असतानाही विजयादशमीनिमित्त सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसला. सराफ बाजारात व्यावसायिकांनी घडणावळ किंवा तयार दागिन्यांवर २५ ते ५० टक्क्यांची सूट देऊ केली होती. त्याचीही भूरळ ग्राहकांना पडली आहे. तसेच गुंतवणुकीच्या दृष्टीनेही वळी, नाणी, बिस्किटांच्या स्वरुपात सोने खरेदीकडे कल वाढला असल्याचे निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले. हिऱ्यांच्या दागिन्यांनाही चांगली मागणी राहिली. सायंकाळी सराफ बाजारांमधील गर्दी वाढल्याचे दिसले. आखाती देश युद्धात सहभागी होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट होत चालल्यामुळे सोमवारी रात्रीपासून कच्चे तेल व सोन्याच्या भावात नरमाई दिसून आली. याव्यतिरिक्त इतर अनेक घटक दरवाढीस कारणीभूत असले तरी दसऱ्याच्या निमित्ताने बाजारात खरेदीचा उत्साह दिसल्याचे पीएनजी सन्सचे संचालक अमित मोडक यांनी सांगितले.

amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’
Nearly 90000 Honda Elevate Suvs Sold Since Launch, See This Details Honda Elevate Suvs price details
वर्षभरात तब्बल ९० हजार ग्राहकांनी खरेदी केली होंडाची ‘ही’ एसयूव्ही कार; जाणून घ्या काय आहे एवढं खास

हेही वाचा >>> अल्पसंख्याक विद्यार्थ्यांबाबत सरकारचा भेदभाव! काँग्रेसचा आरोप, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडे दुर्लक्ष

मालमत्ता बाजारपेठेत उत्साह

सणासुदीच्या काळात घरविक्रीत नेहमीच वाढ होते. याचा अनुभव यंदाही आला. नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून मुंबईतील घरविक्रीत चांगली वाढ झाल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याला मोठय़ा संख्येने गृहप्रवेश करण्याकडे ग्राहकांचा कल दिसतो. त्याप्रमाणे मंगळवारीही अनेकांनी घराचा ताबा घेत गृहप्रवेश केले. दुसरीकडे प्रकल्प स्थळांना भेटी देणे, गृहनोंदणी (बुकिंग) करणे अशा व्यवहारांनाही अनेकांनी प्राधान्य दिले. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक विकासकांनी नव्या प्रकल्पांची घोषणा करतात. याला अनुसरून अनेकांनी काही घोषणा, घरविक्रीस सुरुवात किंवा बांधकामाची पायाभरणी केली. दसऱ्याच्या दिवशी नोंदणी वाढावी यासाठी विकासकांनी अनेक सवलतीही देऊ केल्या होत्या. १ ते २३ ऑक्टोबरदरम्यान घरविक्रीची संख्या ७८२८ असून या मुद्रांक शुल्कातून ६१८ कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला आहे.

वाहन खरेदीसाठी झुंबड

मुंबईतील चार आरटीओ विभागातून एकूण ९,५७२ वाहनांची नोंदणी दसऱ्याच्या मूहूर्तावर झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ४७५ने वाढ झाली. दसऱ्याच्या आधीपासूनच वाहन खरेदी-नोंदणीचे प्रमाण वाढते. या मुहूर्ताला वाहनाचा ताबा घेण्यासाठी प्रत्यक्षात काही दिवस आधी खरेदी केली जाते. यंदा १६ ते २४ ऑक्टोबरदरम्यान राज्यात ८०,१८६ वाहनांची खरेदी झाली. गेल्यावर्षी दसऱ्यापूर्वी २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत ७६,१५७ वाहनांची खरेदी झाली होती. 

नोव्हेंबरपासून लग्नाचे मुहूर्त सुरु होत असल्यामुळे ग्राहक जास्त प्रमाणात दागिने खरेदी करत आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच दागिने खरेदीस सुरुवात झाली आहे. जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे भविष्यात सोन्याचे दर वाढण्याच्या शक्यतेमुळे आताच सोने खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असून त्यांनी दसऱ्याचा मुहूर्त साधला आहे.  यंदा हिऱ्यांचे दागिने खरेदी कारण्याकडेही विशेष कल आहे.

डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

Story img Loader