टाडा न्यायालयासमोर शरण आलेल्या संजय दत्त सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा याचिका दाखल करण्याच्या विचारात आहे. त्याच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तो एक सुधारीत याचिका दाखल करता येईल का यासाठी तो प्रयत्नशील आहे.
दत्त याचे वकिल रिझवान र्मचट यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की संजय दत्त याने आपल्या शिक्षेबाबत पुनर्विचार करण्यासाठी तसेच शिक्षा कमी व्हावी म्हणून याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळली गेली. त्यामुळे आता संजय दत्त सुधारीत दाखल करण्याच्या प्रयत्नात आहे. सर्वोच्च न्यायालयाने २००२ मध्ये ही संकल्पना सुरू केली. पुनर्विचार याचिका फेटाळताना न्यायदानात एखादी चूक झाली आहे अशी शक्यता वाटल्यास सुधारीत याचिका दाखल करता येते, यासाठी कालमर्यादा नाही.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-05-2013 at 04:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dutt likely to file curative petition in sc lawyer