मंगल हनवते, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे उपलब्ध असलेल्या दुकानांचा रखडलेला ई लिलाव अखेर मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. मुंबईतील १७० दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून दुकानांच्या विक्रीची जाहिरात जानेवारीअखेरीस प्रसिद्ध होणार आहे. फेब्रुवारीत दुकांनाचा ई लिलाव होणार आहे. या ई लिलावातील दुकानांसाठी २५ ते १३ कोटी रुपये बोली रक्कम मंडळाने निश्चित केली आहे. तर या दुकानांच्या ई लिलावातून मंडळाला मोठा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

म्हाडा अभिन्यासात गृहप्रकल्प राबविताना त्यात रहिवाशांच्या सोयीसाठी काही दुकानांचाही समावेश करण्यात येतो. म्हाडाच्या गृहप्रकल्पात घरांसह काही दुकानेही बांधण्यात येतात. या दुकानांची विक्री लिलाव पद्धतीने केली जाते. दुकानांसाठी म्हाडा एक निश्चित बोली ठरविते आणि त्यापेक्षा अधिक बोली लावणाऱ्या अर्जदाराला दुकानाचे वितरण केले जाते. या प्रक्रियेनुसार आतापर्यंत मुंबई मंडळाने मोठ्या संख्येने दुकानांची विक्री केली आहे. मात्र मागील काही वर्षांत दुकानांची विक्री झालेली नाही. मोठ्या संख्येने दुकाने पडून आहेत. बिंबिसारनगर, गोरेगाव येथे कोट्यवधी रुपये खर्च करून मंडळाने १७ दुकानांचा समावेश असलेले व्यावसायिक संकुल उभारले असून येथील दुकानेही मागील काही वर्षांपासून धूळ खात पडून आहेत. या पार्श्वभूमीवर म्हाडाने सरत्या वर्षातच उपलब्ध दुकानांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी लिलाव रखडला आहे. मात्र आता दुकानांचा लिलाव मार्गी लावण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. दरम्यान, मंडळाने लिलावाची प्रक्रिया संगणकीय केली असून आता या दुकानांचा ई लिलाव होणार आहे.

आणखी वाचा-यंदा १३२ दिवस उच्च न्यायालयाची दारे बंद, ही आहेत कारणे…

मुंबईतील प्रतीक्षानगर, गव्हाण पाडा, तुंगा पवई, गोरेगाव, मालवणी यांसह अन्य ठिकाणच्या १७० दुकानांच्या ई लिलावाच्या प्रक्रियेला मुंबई मंडळाने वेग दिला आहे. यासाठीची जाहिरात तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. जानेवारीच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात १७० दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती मुंबई मंळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांना अनामत रक्कमेसह अर्ज करता येईल. अर्ज सादर झाल्यानंतर त्यांची छाननी करून पात्रता निश्चिती होईल आणि फेब्रुवारीमध्ये ई लिलाव होईल. या ई लिलावात अधिक बोली लावणारा अर्जदार दुकानासाठी पात्र ठरेल आणि त्याला दुकान वितरित करण्यात येईल. या ई लिलावात ९ मीटर ते २०० मीटरपर्यंतच्या दुकानांचा समावेश असून या दुकानांसाठी २५ लाख रुपये १३ कोटी रुपयांपर्यंतची बोली निश्चित करण्यात आली आहे.

आणखी वाचा-मुंबई : गोखले पुलाची तुळई खाली सरकवण्याचे काम लवकरच

कुठे किती दुकाने

ठिकाणदुकानांची संख्या
प्रतीक्षानगर, शीव१५
स्वदेशी मिल
गव्हाणपाडा, मुलुंड
तुंगा, पवई
बिंबिसारनगर, गोरेगाव१७
मालवणी ५७
चारकोप३४
मागाठाणे १२
कांदिवली १२
अन्य