मुंबई – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल येथील आणखी तीन भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी तीन व्यावसायिक वापरासाठीच्या भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. तीन व्यावसायिक वापराच्या भूखंडांच्या ई लिलावातून एमएमआरडीएला किमान ६५६ कोटी रुपये इतका महसूल मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी एमएमआरडीएने बीकेसीतील सात भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा प्रसिद्ध केल्या असून निविदा प्रक्रिया सुरु आहे. या सात भूखंडांच्या विक्रीतून एमएमआरडीएला ५९४६ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.

एमएमआरडीएकडून सध्या एक लाख कोटींहून अधिकचे पायाभूत सुविधा प्रकल्प मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात राबविले जात आहेत. मेट्रोसह अनेक प्रकल्पांचा यात समावेश असून या प्रकल्पांच्या निधीची पूर्तता कर्ज आणि दुय्यम कर्जाच्या माध्यमातून एमएमआरडीएला करावी लागत आहे. एमएमआरडीएच्या तिजोरीत खडखडाट असल्याने एमएमआरडीएला कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढला असून हा डोंगर आता दीड लाख कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. एमएमआरडीएच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत भूखंडाचा ई लिलाव आहे. त्यामुळे आता निधी पूर्ततेसाठी एमएमआरडीएने भूखंड विक्रीवर भर दिला आहे. त्यानुसार काही महिन्यांपूर्वीच बीकेसीतील सात भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, एमएमआरडीएकडून काही वर्षांपूर्वी बीकेसीतील काही भूखंडांच्या ई लिलावाचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे या प्रयत्नात एमएमआरडीएला यश येत नव्हते. त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर करून सात भूखंडांच्या ई लिलावासाठी ऑगस्टमध्ये नव्याने निविदा काढण्यात आल्या असून आता पुढील प्रक्रिया सुरु आहे.

if congress in power will cancels adani contract
धारावी प्रकल्प रद्द करणार! काँग्रेसचा ‘मुंबईनामा’ जाहीर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
shiv sena shinde group claim 73 thousand duplicate voters in navi mumbai
गावाकडच्या दुबार मतदारांमुळे नवी मुंबईत खळबळ
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
Widening of Uran-Panvel road to be fourteen meters soon
उरण-पनवेल मार्ग लवकरच चौदा मीटर, सात कोटींच्या कामाची निविदा आचारसंहितेत अडकली

हेही वाचा – मुंबई : वडाळ्यात पाणीबाणी, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण

हेही वाचा – मुंबई : मनसे कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी सहा जणांना अटक

सात भूखंडांच्या ई लिलावातून एमएमआरडीएला ५९४६ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. आता त्यात आणखी किमान ६५६ कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. कारण बीकेसीतील आणखी तीन भूखंडांच्या ई लिलावासाठी शनिवारी एमएमआरडीएकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. हे तिन्ही भूखंड व्यावसायिक वापराचे असून यातून एमएमआरडीएला किमान ६५६ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. पहिला भूखंड ५११७.८५ चौ. मीटरचा असून हा भूखंड शैक्षणिक वापरासाठी राखीव आहे. या भूखंडाच्या ई लिलावासाठी १६४.८७ कोटी रुपये अशी बोली लावण्यात आली आहे. दुसरा भूखंड रुग्णालयासाठी राखीव असून या भूखंडाचे क्षेत्रफळ १०,०२६.४४ चौ. मीटर असे आहे. या भूखंडासाठी ३२२.९९ कोटी रुपये अशी बोली एमएमआरडीएने निश्चित केली आहे. त्याचवेळी तिसरा भूखंड हा क्रीडा सुविधासाठी राखीव असून तो ५१३८.८५ चौ. मीटरचा आहे. यासाठी १६४.८७ कोटी रुपये अशी बोली निश्चित करण्यात आली आहे. तीनही भूखंडाच्या ई लिलावासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना निविदा सादर करता येणार आहेत. दरम्यान प्रकल्पाच्या निधी पूर्ततेसाठी भूखंड ई लिलावाचा निर्णय घेतला आहे. तर भूखंडाच्या ई लिलावात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या सर्व अडचणी दूर करून आता निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावेळी निविदांना चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे. या भूखंड ई लिलावातून चांगली रक्कम मिळाली, तर अनेक प्रकल्पातील आर्थिक अडचणी दूर होऊन प्रकल्प वेग घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.