व्यवहार्यता अभ्यास अहवाल महिन्याभरात अपेक्षित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मंगल हनवते

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचे अंतर शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतूवरून (मुंबई पारबंदर प्रकल्प) मेट्रोद्वारे काही मिनिटांत पार करण्याचे प्रवाशांचे स्वप्न पूर्ण होणार की नाही हे महिन्याभरात स्पष्ट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सागरी सेतूवरून मेट्रो नेण्यासाठी मेट्रो १९ (प्रभादेवी – शिवडी – नवी मुंबई विमानतळ) मार्गिकेची आखणी (एमएमआरडीए) केली आहे. या मार्गिकेचा व्यवहार्यता अभ्यास अंतिम टप्प्यात असून महिन्याभरात अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालावर मेट्रो १९ चे भवितव्य ठरणार आहे.

२१.८१ किमीच्या शिवडी-नाव्हाशेवा सागरी सेतूचे काम सध्ये वेगात सुरू असून सप्टेंबर २०२३ मध्ये हा सेतू वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे २०२३ पासून शिवडीवरून नवी मुंबईला केवळ २५ मिनिटांत पोहोचता येणार आहे. या प्रकल्पाचा वापर अधिक व्हावा यासाठी त्यावर मेट्रो मार्गही प्रस्तावित करण्यात आला आहे. सागरी सेतूचे काम सुरू असताना आणि प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार असताना प्रस्तावित मेट्रो मार्गाबाबत कोणतीही कार्यवाही एमएमआरडीएकडून होताना दिसत नव्हती. त्यामुळे सागरी सेतूवरील मेट्रो बारगळल्याचे चित्र होते. मात्र, एमएमआरडीएच्या सर्वंकष वाहतूक अभ्यास-२ नुसार २०२१ ते २०४१ दरम्यानच्या वाहतूक कोंडीचा विचार करून मेट्रोचे जाळे वाढविण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार मेट्रो १९ मार्गिकेचीही शिफारस करण्यात आली आहे.  या शिफारशीनुसार एमएमआरडीएने एका खागसी सल्लागार कंपनीची नियुक्ती करुन सागरी सेतूवरील मेट्रो मार्गाचा व्यवहार्यता अभ्यास सुरू केला आहे. हा अभ्यास आता अंतिम टप्प्यात असून लवकरच यासंबंधीचा अहवाल एमएमआरडीएकडे सादर होईल, अशी माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. अहवालावर या मार्गिकेचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र हा अहवाल सकारात्मक येईल आणि हा मार्ग मार्गी लागेल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रकल्प असा

  • प्रभादेवी-शिवडी-नवी मुंबई विमानतळ मेट्रो १९  २६.५ किमीचा मेट्रो मार्गिका सर्वंकष वाहतूक अभ्यास-२ मध्ये मेट्रो १९ ची शिफारस
  • अंदाजे १४, ७३० कोटी रुपये खर्च अपेक्षित (५ किमीचा मेट्रो २१ आणि १९  मिळून)
  • मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेला मेट्रो १९ जोडणार 
  • सागरी सेतूवर स्वतंत्र बस मार्गिकाही  शिवडीवरून सागरी सेतू मार्गे नवी मुंबई विमानतळपर्यंत मार्गिका पोहोचणार
  • व्यवहार्यता अभ्यास अंतिम टप्प्यात  महिन्याभरात अहवाल सादर होण्याची शक्यता