मुंबई : या वर्षभरात मोजून दोन ते तीनच चित्रपटांचे घवघवीत आर्थिक यश अनुभवणाऱ्या चित्रपटसृष्टीसाठी यंदाची दिवाळी गोड ठरली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘सिंघम अगेन’ आणि ‘भुलभुलैय्या ३’ या दोन चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांनी प्रदर्शित झाल्यापासून पंधरा दिवसांत ४०० कोटी रुपयांपार उडी मारली. या दोन चित्रपटांच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी पुन्हा एकदा हाऊसफुल गर्दी अनुभवल्याचे चित्रपट व्यावसायिकांनी सांगितले. दिवाळीच्या मुहूर्तावर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ आणि अनीस बाज्मी दिग्दर्शित, अभिनेता कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला ‘भुलभुलैय्या ३’ हे दोन मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले.

दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले, तर अनेकदा कमाईच्या बाबतीत नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, या दोन्ही चित्रपटांनी दिवाळीच्या पहिल्याच आठवड्यात प्रत्येकी २०० कोटींहून अधिक कमाई करत चित्रपटसृष्टीला दिलासा दिला. याआधी १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’ या चित्रपटाने ६२७.५० कोटींची कमाई करत सुखद धक्का दिला होता. त्यानंतर तीन महिन्यांनी दिवाळीच्या दोन आठवड्यांत ‘सिंघम अगेन’ आणि ‘भुलभुलैय्या ३’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणले आहे. ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून आत्तापर्यंत जगभरात ३३२.७५ कोटी रुपयांची, तर ‘भुलभुलैय्या ३’ या चित्रपटाने जगभरातून ३३२.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांची देशांतर्गत आर्थिक उलाढाल ४०० कोटी रुपयांपार पोहोचली असल्याने साहजिकच चित्रपट व्यावसायिकांसाठी दिवाळीचा सण आनंदाचा ठरला आहे.

phanindra sama success story
Success Story : दोन मित्रांच्या मदतीने ५ लाखांत व्यवसायास प्रारंभ; मेहनतीच्या जोरावर उभे केले तब्बल ७ हजार कोटींचे साम्राज्य
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Bollywood actress tripti dimri and shahid Kapoor will be seeon together in Vishal Bhardwaj's action film Arjun Ustra
रणबीर कपूर, विकी कौशलनंतर तृप्ती डिमरी ‘या’ चॉकलेट बॉयबरोबर रोमान्स करताना दिसणार; विशाल भारद्वाजच्या ‘अर्जुन उस्तरा’मध्ये झळकणार ही नवी जोडी
भूगोलाचा इतिहास : प्रतिभेचा कालजयी आविष्कार – आर्यभटीय
Time Travel Movies On OTT
‘टाइम ट्रॅव्हल’वर आधारित चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ सिनेमे पाहून डोकं चक्रावेल
all we imagine as last night got news award
मराठमोळ्या छाया कदम यांच्या चित्रपटाचा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर सन्मान; मिळाला ‘हा’ प्रतिष्ठित पुरस्कार

हेही वाचा >>>शपथविधीच्या आमंत्रणासाठी मुंबईत; महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा शिवाजी पार्कवरील सभेत पंतप्रधानांचा विश्वास

‘सिंघम अगेन’ आणि ‘भुलभुलैय्या ३’ या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी २०० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करत चित्रपटगृह उद्याोगाला बळ दिले आहे. या दोन चित्रपटांमुळे प्रेक्षकांमध्येही चैतन्य निर्माण झाले असून त्याची परिणती देशभरातील चित्रपटगृहामध्ये जवळपास ७० टक्क्यांहून अधिक प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्यात झाली. दिवाळीतील दोन्ही आठवडे पीव्हीआर – आयनॉक्सच्या चित्रपटगृहांसह देशभरातील एकपडदा आणि बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये अभूतपूर्व गर्दी होती, अशी माहिती पीव्हीआर – आयनॉक्स समूहाच्या महसूल विभागाचे कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता यांनी दिली.दोन आठवडे उलटल्यानंतरही या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे, त्यामुळे लवकरच हे दोन्ही चित्रपट देशभरातील कमाईच्या बाबतीतही प्रत्येकी ३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास चित्रपटगृह व्यावसायिकांनी व्यक्त केला.‘सिंघम अगेन’, ‘भुलभुलैय्या ३’ या दोन चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांनी प्रदर्शित झाल्यापासून पंधरा दिवसांत ४०० कोटी रुपयांपार उडी मारली आहे, असे चित्रपट व्यावसायिकांनी सांगितले.

हेही वाचा >>>१५८ पक्ष, २०८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात

डिसेंबरमध्येही तीन मोठे सिक्वेलपट

नोव्हेंबरमध्ये चित्रपटांना मिळालेले आर्थिक यश आणि प्रेक्षक प्रतिसाद डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या बाबतीत पाहायला मिळेल, असा अंदाज आहे. डिसेंबरमध्ये दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटासह ‘ग्लॅडिएटर २’ आणि ‘मुफासा : द लायन किंग’ हे हॉलिवूडचे बहुचर्चित सिक्वेलपट प्रदर्शित होतील.अभिनेता वरुण धवनची मुख्य भूमिका असलेला ‘बेबी जॉन’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा’ या पहिल्या चित्रपटाची लोकप्रियता यामुळे ‘पुष्पा २’ला प्रेक्षकांचा निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल. ‘कल हो ना हो’सारखे काही गाजलेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्याने डिसेंबरमध्येही चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी राहील, असा विश्वास गौतम दत्ता यांनी व्यक्त केला.

Story img Loader