पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकाच्या नामांतराला मुंबई ईस्ट इंडियन असोसिएशनने विरोध केला आहे. शिवसेना हे पक्षनाव मिळालेल्या शिंदे गटाने चर्चगेट स्थानकाला माजी अर्थमंत्री सी डी देशमुख यांचे नाव देण्याची मागणी करणारा ठराव नुकताच मंजूर केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- मेट्रो ३ मार्गिकेसाठीची आणखी एक गाडी महिन्याभरात मुंबईत येणार

शिंदे गटाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या विषयावरील ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये चर्चगेट स्थानकाला माजी अर्थमंत्री सी डी देशमुख यांचे नाव देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता लगेचच या ठरावाला विरोध होऊ लागला आहे. चर्चगेट या नावाला इतिहास असून हा इतिहास पुसू नये अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशन आणि मुंबई ईस्ट इंडियन असोसिएशनने केली आहे.

हेही वाचा- मुंबई: मराठी चित्रपट, मालिका क्षेत्राच्या विकासासाठी पोर्टल; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

सी डी देशमुख यांच्याविषयी आम्हाला आदर असून त्यांचे नाव अन्यत्र किंवा सागरी किनारा मार्गाला द्यावे असे मत संस्थेचे पिमेंटा गॉडफ्रे यांनी व्यक्त केले आहे. एखाद्या जागेचे नाव बदलण्यापेक्षा त्याठिकाणी सोयी सुविधा देण्यात याव्यात व त्यावर लक्ष केंद्रित करावे असा सल्ला संस्थेने दिला आहे. राज्य सरकारने आरोग्य सुविधा देण्यावर, जीवनमान सुधारण्यावर, विकासकामे करण्यावर भर द्यावा अशी मागणीही संस्थेने केली आहे. त्यामुळे येत्या काळात चर्चगेटच्या नामांतराचा विषय चिगळण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: East india association opposition to the renaming of churchgate station mumbai print news dpj